शांती निकेतनच्या दीक्षांत समारंभासाठी पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये आहेत. या कार्यक्रमाला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिनाह उपस्थित होत्या.
शांती निकेतनच्या दीक्षांत समारंभाला मोदी उपस्थित राहिले. त्यांचं विमान शांतिनिकेतनमध्ये ठरल्यावेळी पोहोचलं. राजशिष्टाचारानुसार पंतप्रधानांच्या स्वागताला मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी उपस्थित राहायचं असतं.
परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले, तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शांतिनिकेतनमध्ये पोहोचल्या नव्हत्या.
त्यानंतर ममता बॅनर्जी धावत-पळत येत असल्याचं मोदींना दिसलं. मग मोदीही थोडे पुढे चालत गेले. तेव्हा, ममतादीदी ज्या रस्त्यानं येत होत्या, तो थोडा खराब असल्याचं त्यांना दिसलं. त्यामुळे त्यांनी लगेचच ममतांना रस्ता बदलून बाजूच्या रस्त्यानं येण्याबाबत 'मार्गदर्शन' केलं. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मोदी सरकार ज्या मार्गाने जातंय, त्याला कडाडून विरोध करणाऱ्या ममतांना अखेर मोदींनी मार्ग दाखवल्यानं चर्चा रंगली आहे.
नुकतंच कर्नाटकमध्ये कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्यात यूपीएच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि विरोधकांसोबत ममता बॅनर्जीही दिसल्या होत्या. विरोधकांची ही एकजूट केंद्र सरकारचं टेन्शन वाढवणारी आहे. कारण कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने 2019 च्या निवडणुकीची जुळवाजुळव सुरु झाल्याचं दिसत आहे.
VIDEO: