नवी दिल्ली : ग्रामीण भागातील महिलांना तंत्रज्ञानाशी जोडून त्यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारची 'नमो ड्रोन दीदी योजना' (Namo Drone Didi Scheme) अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. या योजनेअंतर्गत गावातील महिलांना आधुनिक ड्रोन चालवण्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महिला शेतकऱ्यांच्या शेतात ड्रोनच्या साहाय्याने खते आणि औषध फवारणीची सेवा देऊन उत्तम कमाई करू शकतात. यामुळे महिलांचे उत्पन्न वाढण्यासोबतच शेतकऱ्यांचा वेळ आणि कष्ट दोन्ही वाचण्यास मदत होत आहे.
Eligibility For Drone Didi Scheme : कोण करू शकते अर्ज? काय आहे पात्रता?
या योजनेचा लाभ प्रामुख्याने महिला बचत गटांशी (Self Help Groups SHG) जोडलेल्या महिलांना दिला जातो. जर तुम्ही कोणत्याही नोंदणीकृत महिला बचत गटाच्या सदस्य असाल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र मानले जाल. अर्जाची छाननी केल्यानंतर सरकारी नियमांनुसार आणि निकषांनुसार महिलांची या प्रशिक्षणाकरिता अंतिम निवड केली जाते.
How To Apply For Drone Didi Yojana : असा करा अर्ज
1. बचत गटाचे सदस्यत्व : अर्ज करण्यासाठी महिला सर्वात आधी कोणत्याही महिला बचत गटाशी (SHG) जोडलेली असणे आवश्यक आहे.
2. सरकारी कार्यालयाशी संपर्क : आपल्या जिल्ह्यातील कृषी विभाग, जिल्हा प्रशासन किंवा 'राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन' (NRLM) च्या कार्यालयात जाऊन या योजनेबाबत सविस्तर माहिती घ्यावी लागते.
3. प्रक्रिया : अनेक राज्यांमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत बचत गटांमधील पात्र महिलांची निवड करून त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवले जाते.
Drone Didi Training And Certification : प्रशिक्षणात काय शिकवले जाते?
निवड झालेल्या महिलांना ड्रोन उडवणे, शेतात कीटकनाशके व खतांची योग्य प्रकारे फवारणी करणे, ड्रोनची देखभाल करणे आणि सुरक्षेचे नियम पाळणे याचे पूर्ण प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या महिलांना अधिकृत प्रमाणपत्र (Certificate) दिले जाते. त्यानंतर महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून शेतकऱ्यांना ड्रोन फवारणीची सेवा पुरवू शकतात.
ही बातमी वाचा:
