चेन्नई : तमिळनाडूतील चेन्नईमध्ये एका इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर महिलेचा (Instagram Influencer Death) आणि तिच्या पतीचा मृतदेह घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, पतीने पत्नीची हत्या (Instagram Influencer Death) करून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतांची ओळख नागलक्ष्मी आणि सुब्रमण्यम अशी झाली असून, दोघेही नंगनल्लूर येथील राहत्या घरात मृतावस्थेत सापडले.(Instagram Influencer Death)

नागलक्ष्मी या लोकप्रिय इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर होत्या. त्यांच्या अकाउंटवर तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. त्या साड्यांचे प्रमोशन करणारे व्हिडिओ आणि साडी नेसण्याबाबत टिप्स शेअर करत असत. त्यांच्या व्हिडिओंमध्ये कधीकधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची झलकही दिसून येत होती.(Instagram Influencer Death)

पोलिसांच्या माहितीनुसार, नागलक्ष्मी नंगनल्लूर आणि अण्णा नगर परिसरात सिल्क साड्यांची दुकाने चालवत होत्या. ‘श्री साई सिल्क’ या व्यवसायाच्या त्या मालक होत्या आणि कुटुंबातील मुख्य कमावत्या होत्या. त्यांना दोन मुलगे आहेत. मोठा मुलगा हरीश भारद्वाज (२१) रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे, तर धाकटा मुलगा शैलेश (१८) चेन्नईत दंतवैद्यकाचे शिक्षण घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती पत्नीचे वाद होत होते, त्यानंतर पती सुब्रमण्यम यांनी दोन वर्षांपूर्वी घर सोडले होते. मात्र अलीकडेच ते चेन्नईत परतले आणि दोघांमध्ये पुन्हा बोलणं झाल्याने ते एकत्र राहू लागले. काही काळानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाले होते.(Instagram Influencer Death)

२७ एप्रिल रोजी धाकट्या मुलाला वडिलांकडून एक संशयास्पद संदेश मिळाल्यानंतर तो घरी पोहोचला. तेव्हा घरात आई-वडिलांचे मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी चेंगलपट्टू शासकीय रुग्णालयात पाठवले. प्राथमिक तपासात पती-पत्नीतील वादातून सुब्रमण्यम यांनी नागलक्ष्मीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुब्रमणियन अलीकडेच चेन्नईत परतले होते. त्यांनी पूर्वीच्या वर्तनाबद्दल माफी मागून नागलक्ष्मी यांना पुन्हा एकत्र राहण्यासाठी राजी केल्याचे सांगितले जाते. २७ एप्रिल रोजी सुब्रमणियन यांनी आपल्या धाकट्या मुलगा शैलेशला एक संशयास्पद संदेश पाठवला. हा संदेश पाहताच सैलाश घाबरला आणि तत्काळ घरी पोहोचला. घरात गेल्यानंतर त्याने पाहिले की, त्याची आई नागलक्ष्मी यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती, तर दुसऱ्या खोलीत वडील सुब्रमणियन यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी चेंगलपट्टू शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. प्राथमिक तपासात पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाल्याचे समोर आले असून, त्यानंतर सुब्रमणियन यांनी पत्नीची हत्या करून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.