मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी जगातील 13 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. फोर्ब्सने नुकतंच जाहीर केलेल्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी 13 व्या क्रमांकावर आहेत.

फोर्ब्सच्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ऑनलाईन ई-शॉपिंग कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस पहिल्या क्रमांकावर आहेत.  बेजोस यांच्यानंतर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आणि वॉरेन बफे यांचा अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक आहे.



मुकेश अंबानी यांची संपत्ती 2018 मध्ये 40.1 अब्ज डॉलर एवढी होती. आता, अंबानी यांची संपत्ती 50 अब्ज डॉलर एवढी झाली आहे. गतवर्षी जगभरातील श्रीमंतांच्या या यादीत मुकेश अंबानी हे 19 व्या स्थानी होते. मात्र, यंदाच्या उत्पन्नानुसार अंबानी यांनी 6 क्रमांकाने आघाडी घेत फोर्ब्सच्या यादीत 13 वे स्थान पटकावलं आहे.