नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारीत असलेला चित्रपट 'उरी : दी सर्जिकल स्ट्राइक' हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर तुफान गाजतोय. या चित्रपटात 'How's the Josh' असा एक डायलॉग आहे. हा डायलॉग गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र ऐकायला मिळत आहे. देशातील अनेक खासदारांनादेखील या डायलॉगने वेड लावल्याचे आज पाहायला मिळाले.
आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थमंत्री चित्रपट सृष्टीसाठी काही योजना जाहीर करत होते. तेव्हा पियुष गोयल यांनी 'उरी : दी सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटाचा उल्लेख केला आणि म्हणाले हा चित्रपट मला खूप आवडला. त्यावेळी सर्व सत्ताधारी खासदारांनी 'how's the Josh' च्या घोषणा सुरु केल्या. सत्ताधारी खासदारांच्या या घोषणांनी संसद दणाणून गेली होती.
विकी कौशलचा 'उरी: दी सर्जिकल स्ट्राइक' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. 2019 या वर्षातला हा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. 'उरी'ने जगभरामध्ये 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाप्रमाणे त्यामधील विविध डायलॉग्जही गाजत आहेत. या चित्रपटातील 'how's the Josh' हा डॉयलॉग तर सर्वत्र गाजत आहे.
मनोरंजन क्षेत्रासाठी एक खिडकी योजना
आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मनोरंजन क्षेत्राशी संबंधित सगळ्या परवानग्या एकाच खिडकीवर मिळणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
...आणि 'How's the Josh'च्या घोषणांनी संसद दणाणली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Feb 2019 02:32 PM (IST)
भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारीत असलेला चित्रपट 'उरी : दी सर्जिकल स्ट्राइक' हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर तुफान गाजतोय. तितकाच या चित्रपटातील 'How's the Josh' हा डायलॉगही गाजतोय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -