देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील..


ठरलं? सिद्धरमय्याच कर्नाटकचे मुख्यमंत्री, तर डीके शिवकुमार यांना 'हे' पद, शनिवारी शपथविधी  


 कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? याचा पेच अखेर सुटला असल्याचं बोललं जात आहे. सिद्धरमय्या (Siddaramaiah) कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि डीके शिवकुमार यांना (DK Shivakumar) उपमुख्यमंत्री पद देण्याचा निर्णय पक्षानं घेतला असल्याची माहिती मिळत आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतच्या दीर्घ चर्चेनंतर कर्नाटकात सरकार स्थापनेसाठी एकमत झालं. शनिवारी (20 मे) बंगळुरूत कर्नाटकमधील नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, अडीच वर्षांनी डिके शिवकुमार मुख्यमंत्री होतील, असा फॉर्म्युला काँग्रेसनं ठरवल्याचं कळतंय.  (वाचा सविस्तर)


उपमुख्यमंत्री नको... मुख्यमंत्रीपदच हवं; नाराज डीके शिवकुमार यांची भूमिका, काँग्रेससमोरील पेच वाढला 


कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असून अजूनही अंतिम निर्णय झाला नाही. सिद्धारमय्या यांचे नाव अंतिम झाल्याच्या बातम्या येत असताना आता मुख्यमंत्रीपदाचे दुसरे दावेदार असलेले डीके शिवकुमार (DK Shivakumar) नाराज असल्याची चर्चा आहे. डीके शिवकुमार हे अजूनही मुख्यमंत्रीपदासाठी अडून असल्याची बातमी आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांड अद्याप कोणत्याही निर्णयावर आलं नाही.  (वाचा सविस्तर)


बैलगाडा शर्यतींवर आज सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल 


राज्यातील बैलगाडा शर्यतीचं भवितव्य आज ठरणार आहे. बैलगाडा शर्यतीच्या परवानगीबाबत आज सुप्रीम कोर्ट अंतिम निकाल देणार आहे. घटनापीठाने सुनावणीनंतर याबाबतची निकाल राखून ठेवला होता.  तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीचा आज एकत्रित निकाल लागणार आहे.  सुप्रीम कोर्ट आज काय निकाल देणार याकडे बैलगाडाप्रेमींचं लक्ष लागले आहे (वाचा सविस्तर)


महाकाय संसदेचं उद्घाटनला मोदी सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीचा मुहूर्त! 


 संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन या महिना अखेरीस होण्याची शक्यता आहे.  राजधानी दिल्लीत सध्या बांधकामाची लगबग वाढली असून दुसरीकडे मोदी सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीची वेळही जवळ येत चालली आहे. त्यामुळे त्याच मुहूर्तावर संसदेच्या नव्या इमारतीचं लोकार्पण होणार का याची चर्चा सुरु झालीय.  (वाचा सविस्तर)


येणारी 5 वर्ष भयंकर उकाड्याची, संयुक्त राष्ट्राचा इशारा 


येत्या पाच वर्षांत जागतिक तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. 2023 ते 2027 या काळात कमाल उष्णता कमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पाच वर्षांत एक असं वर्षही असेल जे 2016 च्या तापमानाचा विक्रम मोडणारं वर्ष ठरेल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. युनायटेड नेशन्सच्या जागतिक हवामान संघटनेनं म्हटलं आहे की, जागतिक तापमान लवकरच पॅरिस हवामान करारामध्ये निश्चित केलेल्या तापमानाची मर्यादा ओलांडण्याची शक्यता आहे.  (वाचा सविस्तर)


अचानक उष्णता वाढण्याचं कारण 'एल निनो'; NASAचा रिपोर्ट 


 देशासह जगातील अनेक देशही वाढत्या उष्णतेमुळे हैराण आहेत. मे महिन्याचे सुरुवातीचे काही दिवस दिलासा देणारे होते, पण त्यानंतर वाढलेल्या भीषण उष्णतेनं पुन्हा अंगाची लाहीलाही होण्यास सुरुवात झाली. यंदा प्रचंड उकाडा, तर पाऊस मात्र कमीच राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामागील कारण 'एल-निनो' असल्याचं हवामान शास्त्रज्ञांचं मत आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत आणखी उष्णता वाढणार असल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे. (वाचा सविस्तर) 


मेष,तूळ, मकर राशीच्या लोकांनी आजचा दिवस महत्त्वाचा, जाणून घेऊया 12 राशींचे आजचे राशीभविष्य  


आजचा दिवस काही राशींसाठी महत्त्वाचा दिवस आहे. कर्क राशीचे लोक आज खूप आनंदी राहतील. तसेच या राशीच्या लोकांच्या घरी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. धनु राशीच्या लोकांवर काही जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. मेषपासून ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल?  वाचा सविस्तर आजचे राशीभविष्य.  


छत्रपती शाहूराजे भोसले यांचा जन्म, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृतीदिन, भारताची पहिली अणूचाचणी; आज इतिहासात


आजचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक आहे. इतिहासात आजच्या दिवशी भारतासाठीचा दिवस हा सुवर्ण अक्षरांनी नोंदवावा अशी घटना घडली. भारताने संशोधन, आत्मनिर्भरता, शास्त्रज्ञांची कठोर मेहनत, दूरदृष्टीपणा आदीच्या जोरावर पहिली अणुचाचणी केली. या अणुचाचणीमुळे जगाने भारताची दखल घेतली. अण्वस्त्र असलेला सहावा देश म्हणून भारताची नोंद झाली. मराठी वृत्तपत्र व्यवसायाचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन आजच्या दिवशी झाले.  वाचा सविस्तर