एक्स्प्लोर

Morning Headlines 14th November : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

मुंबईतील वर्ल्डकप सेमीफायनलच्या तिकीटांची चौपट दरांत विक्री, मुंबई पोलिसांनी सापळा रचला, एकजण ताब्यात

IND vs NZ : सध्या देशात विश्वचषकाच्या (ICC World Cup 2023) फिवर पाहायला मिळत आहे. अशातच स्पर्धा अत्यंत रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. स्पर्धेतील सेमीफायनलचे (ICC World Cup 2023 Semifinal) चार संघ मिळाले असून आता सेमीफायनलचा थरार रंगणार आहे. टीम इंडिया (Team India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात पहिला सेमीफायनलचा सामना खेळवण्यात येणार आहे. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा सेमीफायनलचा सामना खेळवण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, सेमीफायनल 1 टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार असून सेमीफायनलचं तिकीट मिळवण्यासाठी साऱ्यांचीच धडपड सुरू आहे. अशातच मुंबई पोलिसांनी याचप्रकरणी कारवाई करत टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सेमीफायनल सामन्याचं तिकीट मूळ किंमतींपेक्षा चार ते पाच पटींनी वाढीव किमतींनी विकाणाऱ्या एकाला अटक केली आहे. वाचा सविस्तर 

Weather Update : थंडीत पावसाचा खेळ! राज्यासह देशात पावसाची शक्यता

Weather Update Today : राज्यासह देशात गुलाबी थंडीला (Cold Weather) चाहूल लागली असली तरी, मधेच अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. दिवाळीत राज्यासह देशभरात वरुणराजाची हजेरी पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यासह देशात अवकाळी पाऊस पाहायला मिळत आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. आज महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीसह काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पाहायला मिळणार आहेत. वाचा सविस्तर 

Post Office ची धमाकेदार योजना; एकदाच पैसे गुंतवा अन् व्याजातून लाखोंची कमाई करा!

Post Office Time Deposit Scheme: पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) लहान मुलं आणि वृद्धांसाठी अनेक बचत योजना (Saving Schemes) चालवल्या जातात. यापैकी एक विशेष योजना गुंतवणूकदारांना केवळ व्याजाद्वारे लाखो कमावण्यास मदत करतेय. तुम्हाला या योजनेबाबत माहिती आहे का? चिंता करू नका, आम्ही सांगतो. आम्ही पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीमबद्दल (Post Office Time Deposit Scheme) बोलत आहोत. या पंचवार्षिक योजनेत तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासोबतच तुम्हाला मोठा रिटर्नही मिळतो. यामुळे, ही योजना पोस्ट ऑफिसच्या सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक आहे. वाचा सविस्तर 

सेमीफायनलचा सामना टाय झाला तर विजेता कसा ठरणार? IND vs NZ सामन्याआधी समजून घ्या नियम

India vs New zealand World Cup 2023 : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 2019 च्या विश्वचषकात झालेला अंतिम सामना सर्व क्रिकेट रसिकांना आठवत असेल. फायनलचा सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली. पण तिथेही दोन्ही संघाची धावसंख्या समान झाली. त्यामुळे नियमांनुसार, चौकारांच्या संख्येवर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे मेहनत केल्यानंतर न्यूझीलंडला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.  त्यामुळे या निर्णयावर अनेक आजी माजी खेळाडूंनी टीका केली होती. त्यामुळे यंदाही उपांत्य आणि अंतिम फेरीत अशी स्थिती निर्माण झाली तर काय नियम असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. गेल्यावर्षी या नियमांमुळे वादंग झाल्यानंतर आयसीसीने या नियमांत बदल केला आहे. वाचा सविस्तर 

Tata Group : टाटा समूहातील 'या' कंपनीमध्ये होणार नोकर कपात; 800 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारी कुऱ्हाड

मुंबई :  टाटा समूहातील (Tata Group) कंपनीमध्ये नोकर कपात करण्यात येणार आहे. टाटा स्टील (Tata Steel) या कंपनीमध्ये ही नोकर कपात होणार आहे. मात्र, हा निर्णय नेदरलँड्समधील कारखान्यात घेतला गेला आहे. नेदरलँड्समधील IJmuiden येथील प्लांटमधील 800 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार आहे. अॅमस्टरडॅमपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या या प्लांटमध्ये एकूण 9200 कर्मचारी काम करत आहेत. वाचा सविस्तर 

14 November In History : पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म, बालदिन, सचिन तेंडूलकरने शेवटचा कसोटी सामना खेळण्यास केली सुरुवात; आज इतिहासात

मुंबई : 14 नोव्हेंबर ही तारीख स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणून इतिहासात नोंदली गेली आहे. त्यांची जयंती ही बालदिन म्हणूनही साजरी केली जाते. 14 नोव्हेंबर 1889 रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद (आता याचं नाव बदलून प्रयागराज करण्यात आले आहे) येथे जन्मलेल्या नेहरुंना लहान मुलं फार आवडायची. 1964 पूर्वी भारतात 20 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जात होता, परंतु जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर त्यांचा वाढदिवस म्हणजेच 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक देशांमध्ये 1 जून हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. काही देश संयुक्त राष्ट्रसंघाच्या घोषणेनुसार 20 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करतात. आजच्याच दिवशी क्रिकेटचा देव म्हणून ज्याला संपूर्ण जग ओळखतं त्या सचिन तेंडूलकरने त्याचा 200 वा आणि शेवटचा कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली होती. वाचा सविस्तर 

Horoscope Today 14 November 2023 : आजचा मंगळवार महत्त्वाचा! कोणत्या राशींना लाभ, कोणाला नुकसान? 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 14 November 2023 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 14 नोव्हेंबर 2023 मंगळवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीच्या लोकांचे आज कुटुंबातील कोणाशी तरी मतभेद होऊ शकतात. तुम्ही तुमचा राग शांत करण्याचा प्रयत्न करा. कर्क राशीच्या लोकांनी त्यांच्या कामात कोणत्याही प्रकारची चूक करू नये, अन्यथा त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. सर्व राशीच्या लोकांसाठी मंगळवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget