(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Morning Headlines 13th November : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Maharashtra Weather Update : राज्यात पुढील 24 तासांत अवकाळी बरसणार, 'या' जिल्ह्यात पावसाचा अंदाज
Weather Update Today : राज्यात गेले काही दिवस अनेक जिल्ह्यात जोरदार पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. राज्यात पुढील 24 तासांत पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. देशासह राज्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यासह देशात ढगाळ वातावरण निर्माण झालं असून अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. राज्यासह देशात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. राज्यात थंडी (Winter) पडण्यास सुरुवात झाली असून नोव्हेंबरच्या शेवटी थंडीचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. वाचा सविस्तर
Air Quality Index : मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी खालावली! फटाक्यांची आतषबाजीचा फटका, 24 तासात 150 कोटींचे फटाके फुटले
Mumbai Air Quality Index : मुंबईकरांनी (Mumbai) जोरदार दिवाळी (Diwali 2023) साजरी केली आहे. लक्ष्मीपूजनाच्या (Laxmi Pujan) दिवशी 24 तासांत मुंबईत तब्बल 150 कोटी रुपयांचे फटाके फुटल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता (AQI) पातळी पुन्हा खालावली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी 288 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आले आहेत. वाचा सविस्तर
अद्भुत, अलौकिक, अविस्मरणीय... अयोध्येतील दिपोत्सवाचे फोटो शेअर करत पंतप्रधानांकडून दिवाळीच्या शुभेच्छा!
Diwali 2023: दिवाळीनिमित्त (Diwali Celebration) प्रभू रामाची अयोध्या नगरी 22 लाख दिव्यांनी उजळून निघाली होती. पंतप्रधान मोदींनी (PM Modi) अयोध्येत (Ayodhya) आयोजित केलेल्या दीपोत्सवाचं (Deepotsav) वर्णन अद्भुत, अलौकिक आणि अविस्मरणीय असं केलं आहे. दीपोत्सवाचे काही सुंदर फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि प्रभू श्री राम सर्व देशवासियांना आशीर्वाद देवो, अशी माझी इच्छा आहे. माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी ते प्रेरणास्थान बनू दे, असंही मोदींनी शुभेच्छा देताना म्हटलं आहे. वाचा सविस्तर
Uttarkashi Accident : बोगद्याचा भाग कोसळल्याने 36 मजूर अडकले, पाईपच्या मदतीने ऑक्सिजन पुरवठा; 24 तासांनंतरही बचावकार्य सुरुच
Uttarkashi Tunnel Collapse : ऐन दिवाळीत उत्तरकाशीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशी (Uttarkashi) शहरामध्ये निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळल्याने 36 मजूर आतमध्ये अडकले आहेत. 24 तासांनंतरही अडकलेल्या मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्यात येत आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना पाईपच्या मदतीने ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी वॉकीटॉकीद्वारे संपर्क झाल्याची माहिती समोर आली आहे. वाचा सविस्तर
IND vs NZ Semi-Final: सेमीफायनलचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास, काय होणार? फायनलचं तिकीट कोण गाठणार?
India vs New Zealand: विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023) मध्ये लीग स्टेजमधील सर्व 45 सामने खेळले गेले आहेत. लीग स्टेजनंतर विश्वचषकातील सेमीफायनलचे चार संघ ठरले आहेत. तर, सहा संघ आपापल्या बॅगा भरुन मायदेशी परतले आहेत. सेमीफायनलमध्ये पोहोचलेले चार संघ मुंबई (Mumbai) आणि कोलकात्यात (Kolkata) तळ ठोकून आहेत. टीम इंडिया (Team India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात सेमीफायनलचा (ICC World Cup 2023 Semifinal) सामना खेळवण्यात येणार असून 15 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. वाचा सविस्तर
13 November In History : रवींद्रनाथ टागोर यांना 'गीतांजली' काव्यसंग्रहासाठी नोबेल पुरस्कार जाहीर, माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचा जन्म; आज इतिहासात
मुंबई : माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांची जयंती आहे. तर आजच्याच दिवशी : रवीन्द्रनाथ टागोर यांना स्वीडिश अॅकॅडमीने गीतांजली या साहित्यासाठी नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले होते. 13 नोव्हेंबर 1917 साली सांगली जिल्ह्यातील पद्माळे या छोट्या गावी शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक निर्णायक वळण देणारे सहकारमहर्षी म्हणून वसंतदादा पाटील यांना ओळखले जाते. यासोबतच 13 नोव्हेंबर रोजी अनेक चांगल्या-वाईट घटना घडल्याची इतिहासात नोंद आहे. या दिवशी कोलंबियामध्ये एक दुःखद घटना घडली. 13 नोव्हेंबर 1985 रोजी कोलंबियात ज्वालामुखीचा उद्रेक झाला. वाचा सविस्तर
Somvati Amavasya 2023 : आज 2023 ची शेवटची अमावस्या विशेष! आर्थिक समस्या, आजारांपासून होईल सुटका; स्नान, दान, पुजेचा मुहूर्त
Somvati Amavasya 2023 : हिंदू धर्मात सोमवती अमावस्या महत्वाची मानली जाते. वर्षभरात एकूण 12 अमावस्या येतात, त्यापैकी एक सोमवती अमावस्या आहे. महिला हे व्रत पाळतात. असे मानले जाते की, उपवास केल्याने व्यक्तीला ग्रहांच्या समस्या, जुनाट आजार आणि शारीरिक वेदनांपासून आराम मिळतो. तर सोमवती अमावस्या तिथीला स्नान आणि दान करण्यासाठी अतिशय शुभ मानले जाते. वाचा सविस्तर
Horoscope Today 13 November 2023 : आजचा सोमवार खास! कोणत्या राशींना होणार फायदा, कोणाला नुकसान? आजचे राशीभविष्य
Horoscope Today 13 November 2023 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 13 नोव्हेंबर 2023, सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीच्या लोकांना आज नुकसान सहन करावे लागेल. आपण थोडे सावध असले पाहिजे. कर्क राशीच्या लोकांनी कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहावे, अन्यथा तुम्ही एखाद्या समस्येत अडकू शकता. सर्व राशीच्या लोकांसाठी सोमवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर