Increased DA Of Central Employees by 4 Percent: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची सर्वात मोठी घोषणा. नरेंद्र मोदी सरकारनं (Modi Government) दिवाळीपूर्वी (Diwali 2023) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central Employees) महागाई भत्त्यात (DA Hike) 4 टक्के वाढ केली आहे. यानंतर त्यांना मिळणारा डीए (DA) आता 42 टक्क्यांवरून 46 टक्के झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकार महागाई भत्त्यात वाढ करणार का? वाढ मिळाली तर किती मिळणार? अशा अनेक चर्चा सुरू होत्या. तसेच, केंद्रीय कर्मचाऱ्यांना 4 टक्के डीए वाढ मिळण्याची अपेक्षा होतीच. अशातच मोदी सरकारनंही 4 टक्के महागाई भत्त्याची वाढ करत दिवाळीपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना गोड गिफ्ट दिलं आहे. दरम्यान, मोदी सरकानं केंद्रीय कर्मचारी आणि पेशन्सधारकांना फायदा होणार असून त्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये जोरदार वाढ होणार आहे.


महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्के


नरेंद्र मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळानं केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के (4% DA Hike) वाढ केल्यानंतर आता तो 42 टक्क्यांवरुन 46 टक्के झाला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा फायदा 1 जुलै 2023 पासून उपलब्ध होईल. महागाई भत्ता वाढल्यानं कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणार आहे. वर्ष 2023 साठी, सरकारनं पहिली दुरुस्ती केली होती आणि 24 मार्च 2023 रोजी डीए वाढवण्याची घोषणा केली होती, तेव्हा 38 टक्के डीए 4 टक्क्यांनी वाढवून 42 टक्के करण्यात आला होता. यानंतर 1 जानेवारी 2023 पासून या वाढीव महागाई भत्त्याचा लाभ कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार असल्याची घोषणा केली होती. 


DA मध्ये दरवर्षी दोनदा बदल 


केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाई भत्ता महत्त्वाची भूमिका बजावतो. सरकार वर्षातून दोनदा DA मध्ये सुधारणा करतं. ज्याचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी आणि 1 जुलैपासून दिला जातो. उल्लेखनीय बाब म्हणजे, देशात सुमारे 52 लाख कर्मचारी केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करतात आणि 60 लाख पेन्शनधारक आहेत, ज्यांना सरकारच्या या मोठ्या निर्णयाचा फायदा होणार आहे.


कर्मचाऱ्यांचे पगार कितीनं वाढणार? 


केंद्र सरकारकडून डीए वाढीची घोषणा केल्यानंतर केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारवाढीबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहेत. केंद्र सरकारनं महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे नेमकी किती रुपयांची पगारवाढ मिळणार हे एका उदाहरणातून समजून घेऊयात... 


जर एखाद्या केंद्र सरकारच्या कर्मचार्‍याला मूळ वेतन 18 हजार रुपये मिळत असेल, तर कर्मचार्‍याचा महागाई भत्ता सध्या 42 टक्के दरानं 7,560 रुपये आहे. अशातच आज सरकारकडून महागाई भत्त्यात करण्यात आलेल्या 4 टक्क्यांच्या वाढीनंतर 46 टक्क्यांनुसार जर पगारवाढ मोजला तर ती 8,280 रुपये होईल. म्हणजेच, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट 720 रुपयांची वाढ होणार आहे.


4 टक्के डीए वाढीनंतर जास्तीत जास्त Basic Pay असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारातील वाढ मोजली तर 56,900 रुपये मूळ वेतन मिळवणाऱ्या कर्मचाऱ्याला 42 टक्के दरानं 23,898 रुपये डीए मिळेल आणि 46 टक्के दरानं 26,174 रुपये मिळतील. म्हणजेच, पगारात थेट 2,276 रुपयांची वाढ होणार आहे.


महागाईच्या आधारावर निर्णय होणार


कर्मचारी सतत 4 टक्के डीए वाढीची मागणी करत आहेत. कर्मचार्‍यांच्या पगाराचा डीए हा महत्त्वाचा भाग असून त्यात वाढ झाल्याचा थेट परिणाम कर्मचार्‍यांना मिळणाऱ्या पगारावर होतो. पण ते कसे ठरवले जाते हे तुम्हाला माहिती आहे का?  महागाईचा दर लक्षात घेऊन सरकार कर्मचाऱ्यांचा डीए वाढवण्याचा निर्णय घेते. महागाई जितकी जास्त असेल तितकी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ अपेक्षित आहे. यासाठी CPI-IW डेटा मानक मानला जातो. जुलै 2023 मध्ये, CPI-IW 3.3 अंकांनी वाढून 139.7 वर पोहोचला होता. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीशी तुलना केल्यास ती सुमारे 0.90 टक्के अधिक होती. यापूर्वी जून 2023 मध्ये ते 136.4 होते आणि मे महिन्यात ते 134.7 होते. जर आपण ऑगस्टबद्दल बोललो तर 0.5 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे, ती 139.2 टक्क्यांवर आली आहे. अशा परिस्थितीत सरकार 4 ऐवजी 3 टक्के वाढ देऊ शकते, म्हणजेच महागाई भत्ता 42 वरून 45 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


आनंदवार्ता! केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, पण कोणत्या गटातील कर्मचाऱ्यांना किती पैसे मिळणार?