मुंबई : आपण ज्या लोकप्रतिनिधींना निवडून देतो त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळतो का? याबाबत अनेकांना माहिती नसते. अनेकांना असं वाटतं की आमदार, खासदारांना काही वेतन वगैरे मिळत नाही. मात्र असं काही नसून आमदार, खासदारांना चांगला लाखांहून अधिक पगार मिळतो. त्यासह दणकाहून भत्ते देखील मिळतात. सोबत माजी खासदार आणि आमदारांना देखील निवृत्ती वेतन मिळते. 


आधी आपण आमदारांना मिळणाऱ्या वेतन आणि भत्त्यांबाबत जाणून घेऊयात
आमदारांना महिन्याकाठी तब्बल 1 लाख 82 हजार वेतन मिळतं. कोविड काळात यात तीस टक्के कपात करण्यात आली आहे. मात्र कोविडच्या आधी  आमदारांना 1 लाख 82 हजार 200 रुपये वेतन मिळायचे तर  महागाई भत्ता 21 टक्के म्हणजेच 30  हजार 974 रुपये इतका मिळतो. फोन बिल, टपाल, संगणक चालक अशा अन्य सुविधांसाठीही त्यांना भत्ते दिले जातात. असं मिळून त्यांचं निव्वळ एकूण वेतन 2 लाख 40 हजार 973 रुपयांच्या वर जातं. 


आमदारांना कसा मिळतो पगार
वेतन - 1 लाख 82 हजार 
महागाई भत्ता - 21 टक्के  30  हजार 974
दुरध्वनी- 8 हजार रुपये
टपाल-  10 हजार रुपये
संगणक चालक- 10 हजार रुपये
एकूण वेतन दरमहा- 2 लाख 41 हजार 174 रुपये
 
कोविड महामारीमुळे सर्व विधानसभा, विधान परिषद आमदारांचे वेतन एप्रिल 2020 ते मार्च 2021 या कालावधीत 30 टक्के कपात करण्यात आली होती. त्याप्रमाणे आमदारांना या काळात 70 टक्के पगार मिळत होता.


आमदारांना एप्रिल 2020 ते मार्च 2021 कालावधीतील पगार 


वेतन- 1 लाख 27 हजार 540 रुपये
महागाई भत्ता 21 टक्के- 21 हजार 682 रुपये
दुरध्वनी- 5 हजार 600 रुपये
टपाल- 7 हजार रुपये
संगणक चालक- 7 हजार रुपये
एकूण वेतन दरमहा- 1 लाख 68 हजार 882 रुपये


आता खासदारांना मिळणारा पगार जाणून घेऊयात...


PRS : https://hi.prsindia.org/ या वेबसाईटनुसार खासदारांना देखील आमदारांप्रमाणेच पगार मिळतो, मात्र आमदारांच्या तुलनेत खासदारांना अन्य काही चांगल्या सुविधा दिल्या जातात. कोविड काळात खासदारांच्या देखील वेतनात  30 टक्के कपात केली गेली. कोविड काळाआधी खासदारांना एक लाख रुपये वेतन मिळायचे. तर मतदारसंघ भत्ता म्हणून 70 हजार तसेच कार्यालयीन भत्ता म्हणून 60 हजार रुपये मिळायचे. तसेच अन्य भत्ते मिळून खासदारांना अडीच लाखांपर्यंत एकूण वेतन मिळायचे. मात्र कोविड काळात वेतनात कपात केल्यामुळं आता खासदारांना महिन्याला 70 हजार रुपये वेतन मिळते तर मतदारसंघ भत्ता म्हणून 49 हजार तसेच कार्यालयीन भत्ता म्हणून 54 हजार रुपये मिळतात. अन्य भत्त्यांमध्ये खासदारांना महिन्याला पंतप्रधान सत्कार भत्ता, कॅबिनेट मंत्री सत्कार भत्ता, राज्यमंत्री सत्कार भत्ता असे वेगवेगळे भत्ते देखील मिळतात.  


सरकारमधील अन्य काही महत्वाच्या अधिकाऱ्यांचा पगार (PRS : https://hi.prsindia.org/ वरुन माहिती)


संसद सदस्य (खासदार)-  1,00,000


सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश- 2,50,000


केंद्र सरकारमधील सचिव- 2,25,000


सेबी चेअरमन- 2,25,000


आरबीआय गव्हर्नर- 2,50,000