मुंबई:बॉलिवूडचा डिस्को डान्सर आणि आता राजकारणातही टायगर असलेला मिथुन चक्रवर्ती पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पाकिस्तानकडून भारताला मिळालेल्या धमक्यांवर भाष्य करताना मिथुनदाने असा काही भन्नाट डॉयलॉग फेकला की, पत्रकारांच्या चेहऱ्यावर एकच हसू आले. 140 कोटी भारतीयांनी धरणात लघुशंका केली आणि त्या धरणाचे दरवाजे उघडले तर पाकिस्तानमध्ये त्सुनामी येईल असं मिथुनदाने म्हटलं. मिथुनच्या या भन्नाट धमकीनंतर सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेत जाऊन भारताला अण्स्त्रांची धमकी दिली. ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकिस्तानचा माज उतरला नसल्याचं दिसतंय. तर भारताने जर सिंधू नदीवर धरण बांधलं तर पाकिस्तान युद्ध करेल अशी दर्पोक्ती बिलावल भुट्टोने केली होती. त्याला उत्तर देताना मिथून चक्रवर्तीने अजब मार्ग सूचवला.

नेमकं काय म्हणाला मिथुन?

"पाकिस्तानच्या लोकांवर मी काही बोलणार नाही. पाकिस्तानच्या लोकांना युद्ध नको आहे. परंतु बिलावर भु्ट्टो असं बोलत राहिले तर आमचे डोके सटकेल, एकानंतर एक ब्रह्मोस डागले जातील. यातील काहीच नाही झालं तर आम्ही विचार केला आहे की एक धरण बांधू. त्यामध्ये 140 कोटी भारतीय लघुशंका करतील. त्यानंतर आम्ही धरणाचे दारे उघडू. कोणतीही गोळी चालणार नाही, पण त्सुनामी येईल."

आपण जे काही बोललो ते बिलावल भुत्तोला बोललो, पाकिस्तानच्या लोकांना काही बोललो नाही असं मिथुनने स्पष्ट केलं.

बिलावल भुट्टोचा आरोप

सिंध सरकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री बिलावल भु्ट्टो याने भारतावर आरोप केला होता की, सिंधु नदीवरील जलप्रकल्प पाकिस्तानच्या जलसुरक्षेला धोका आहे. भारताने याचे पाणी वळवलं गेलं, तर हा प्रकार थेट युद्धाला कारणीभूत ठरेल अशी दर्पोक्ती त्याने केली.

त्या आधी पाकिस्तानचा सेना प्रमुख जनरल असीम मुनीर याने भारताला अण्वस्त्रांच्या वापराची उघड धमकी दिली होती. भारताने सिंधू नदीचा प्रवाह वळवला तर आम्ही भारतावर अणवस्त्र डागू असं त्याने म्हटलं होतं.