नवी दिल्ली : आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. हे उपाय भारतातील 16 मोठ्या वैद्यांच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असताना, हे काही आयुर्वेदिक उपाय आहेत, जे मानवी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरु शकतात. हे उपाय म्हणजे कोरोनावरील इलाज नाही तर शरीर सुदृढ ठेवण्यासाठी घरगुती उपाय आहेत.


सर्वसामान्य उपाय
- दररोज सतत गरम पाणी प्या
- दिवसातून अर्धातास योगासनं, प्राणायाम आणि मेडिटेशन अवश्य करा.
- हळद, जिरे, लसूण आणि धण्याचा आहारात समावेश करा.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपचार
- दररोज सकाळी एक चमचा किंवा 10 ग्रॅम च्यवनप्राश खावं. मधुमेहींनी सुगर फ्री च्यवनप्राश खावं
- हर्बल चहा प्यावा.
- तुळस, दालचिनी, काळीमिरी, सुंठ, मणुका, गूळ, लिंबू रसाचा काढा बनवून प्यावा
- दिवसात एक-दोनवेळा हळद टाकलेलं दूध प्यावं.

सोपे आयुर्वेदिक उपचार
- रोज सकाळी आणि संध्याकाळी नाकात तीळाचं तेल किंवा खोबरेल तेल आणि तूप लावावं.
- ऑईल पुलिंग थेरेपी
- एक चमचा तिळाचं किंवा खोबरेल तेल, दोन ते तीन मिनिटं तोंडात ठेवा आणि नंतर थुंका. यानंतर दर पाण्याने गुळण्या करा. ही क्रिया दिवसातून एक-दोनवेळा करा.

कोरडा खोकला/ घसादुखी
खोकला किंवा घसादुखी झाल्यास
- पुदिन्याची पाणी किंवा ओव्याच्या पाण्याची वाफ घ्यावी.
- खोकला किंवा घशात खवखव झाल्यास लवंगाची पावडर मध किंवा साखरेसोबत दोन ते तीन वेळा खावी.

खोकला किंवा घसादुखी तसंच खवखव कायम राहिली तर तातडीने डॉक्टरांना दाखवा.

या वैद्यांच्या सल्ल्यानुसार वरील आयुर्वेदिक उपाय तयार करण्यात आले आहेत

1. पद्मश्री वैद्य पी आर कृष्णकुमार, कोईम्बतूर
2. पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा, दिल्ली
3. वैद्य पी एस वॉरियर, कोट्टकल
4. वैद्य जयंत देवपुजारी, नागपूर
5. वैद्य विनय वेलणकर, ठाणे
6. वैद्य बी एस प्रसाद, बेळगाव
7.पद्मश्री वैद्य गुरदीप सिंह, जामनगर
8. आचार्य बालकृष्णजी, हरिद्वार
9. वैद्य एम एस बघेल, जयपूर
10. वैद्य आर बी द्विवेदी, हरदोई
11. वैद्य के एन द्विवेदी, वाराणसी
12. वैद्य राकेश शर्मा, चंदीगड
13. वैद्य अबिचल चट्टोपाध्याय, कोलकाता
14. वैद्य तनुजा नेसारी, दिल्ली
15. वैद्य संजीव शर्मा, जयपूर
16. वैद्य अनुप ठाकूर, जामनगर