Meghalaya Earthquake: मेघालयमध्ये (Meghalaya News) भूकंपाचे सौम्य धक्के (Earthquake News) जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानं (National Center for Seismology) दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे 3.46 वाजता राज्यातील तुरापासून 37 किमी पूर्व-ईशान्य दिशेला भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4 इतकी मोजली गेली. 


नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची खोली जमिनीखाली 5 किमी होती. बुधवार 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेशातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. महाराष्ट्रातील नाशकातील काही भागांत भूकंपाचे धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 3.6 इतकी मोजण्यात आली होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिकच्या पश्चिमेला ८89 किमी असून तो जमिनीपासून 5 किमी खोलीवर होतं. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.




लडाखमध्येही जाणवले भूकंपाचे धक्के 


मंगळवारी लडाखमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 4.3 इतकी होती आणि सकाळी 10 वाजून 5 मिनिटांनी हे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू कारगिलपासून 191 किमी उत्तरेस होता.


भूकंपाचे कारण?


भूकंप झाल्यावर पृथ्वी हादरण्याचं खरं कारण म्हणजे, पृथ्वीच्या आतील प्लेट्सची टक्कर. पृथ्वीच्या आत सात प्लेट्स आहेत ज्या सतत फिरत असतात. जेव्हा या प्लेट्स एखाद्या ठिकाणी एकमेकांवर आदळतात, तेव्हा फॉल्ट लाईन झोन तयार होतो आणि प्लेटचे कोपरे दुमडले जातात. दुसरीकडे, जेव्हा टेबलचे कोपरे वाकलेले असतात तेव्हा त्याच्या दाबामुळे, प्लेट्स तुटू लागतात. या प्लेट्स तुटल्यामुळे आतील ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग पाहते, ज्यामुळे पृथ्वी हादरते. या पृथ्वीच्या थरथराला भूकंप म्हणतात.


भूकंप आल्यास काय करावे आणि काय करू नये?


भूकंपाचे धक्के जाणवल्यावर अजिबात घाबरू नका. सर्वप्रथम तुम्ही एखाद्या इमारतीत असाल तर इमारती बाहेर या आणि मोकळ्या मैदानावर, जागेवर उभे राहा. इमारतीतून उतरताना लिफ्टचा वापर टाळावा. भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करणे धोकादायक ठरू शकते. त्याच वेळी, इमारतीतून खाली उतरणे शक्य नसल्यास, जवळ असलेल्या टेबलखाली किंवा पलंगाखाली लपून राहा.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Earthquake in Palghar : भूकंपाच्या धक्क्यांनी पालघर हादरलं; 3.6 रिश्टर स्केलचे धक्के, नागरिक भयभीत