Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाई यांच्या राजीनाम्यानंतर, तामिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष करू नागराजन आणि राज्य सचिव सुमती व्यंकटेश यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Tamil Nadu BJP Crisis: तामिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्या राजीनाम्यामुळे भारतीय जनता पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अण्णामलाई यांच्या राजीनाम्यानंतर, तामिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष करू नागराजन आणि राज्य सचिव सुमती व्यंकटेश यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, करू नागराजन आणि सचिव सुमती व्यंकटेश यांच्यासह पक्षाच्या किमान 14 इतर अधिकाऱ्यांनीही आपले राजीनामे सादर केले आहेत. यामुळे तमिळनाडू भाजपत भगदाड पडल्याचे स्पष्ट झालं आहे.
भाजप सोडल्यानंतर करू नागराजन काय म्हणाले?
राजीनामा दिल्यानंतर, माजी प्रदेशाध्यक्ष करू नागराजन यांनी माजी आयपीएस अधिकारी के. अण्णामलाई यांच्या नव्या राजकीय चळवळीत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. नागराजन म्हणाले की, अण्णामलाई यांनी केवळ तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्याच नव्हे, तर कोणाच्याही चुका उघड करण्यास कधीही संकोच केला नाही. त्यांनी के. अण्णामलाई यांची प्रशंसा करत म्हटले की, ते खूप धाडसी आहेत आणि त्यांना अनेक क्षेत्रांची सखोल जाण आहे, ज्यामुळे ते एक खंबीर आणि सक्षम नेते बनतात.
सुमती व्यंकटेश यांचाही राजीनामा
दरम्यान, तामिळनाडू भाजपच्या राज्य सचिव सुमती व्यंकटेश यांनीही 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टद्वारे आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. 'एक्स'वरील पोस्टमध्ये त्या म्हणाल्या, "जड अंतःकरणाने, मी माझ्या पक्षाच्या पदाचा राजीनामा देत आहे आणि भारतीय जनता पक्षाशी असलेला माझा संबंध संपवत आहे." त्या म्हणाल्या, "भारतीय जनता पक्षाची सेवा करणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि सौभाग्याची बाब आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रवाद, देशभक्ती आणि राष्ट्रसेवेच्या आदर्शांनी खूप प्रेरित आहे." या मूल्यांनी माझ्या संपूर्ण प्रवासात मला नेहमीच मार्गदर्शन केले आहे आणि भविष्यातही करत राहतील.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा






















