Marriage Equality In The World : सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) ने समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यास नकार दिला आहे. समलैंगिक विवाहासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला (Same Sex Marriage In India) असल्याचं म्हटलं आहे. भारतात समलिंगी संबंधांला मान्यता असली तरी, समलैंगिक विवाहाला मान्यता  नाही. दरम्यान, काही देशांमध्ये समलिंगी विवाह वैध मानले (Marriage Equality Around the World) जातात. जगभरातील सध्या 34 देशांमध्ये समलैंगिक विवाहाला मान्यता आहे. अंडोरा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, ब्राझील, कॅनडा, चिली, कोलंबिया, कोस्टा रिका, क्युबा, डेन्मार्क, इक्वेडोर, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, आइसलँड, आयर्लंड, लक्झेंबर्ग, माल्टा, मेक्सिको, नेदरलँड, न्यूझीलंड, नॉर्वे, पोर्तुगाल, स्लोव्हेनिया, दक्षिण आफ्रिका, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, तैवान, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि उरुग्वे या देशांमध्ये समलैंगिक विवाह करणे कायदेशीर आहे. याशिवाय एस्टोनियाच्या संसदेने 20 जून 2023 रोजी संमत केला असून हा कायदा 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे.


जगातील 34 देशांमध्ये समलैंगिक विवाहाला मान्यता


23 देशांमध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि स्वित्झर्लंडने देशव्यापी मतदानानंतरच कायद्याद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यात आली. 2017 साली ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि स्वित्झर्लंडमध्ये सार्वमत चाचणी घेतल्यानंतर संसदेने समलैगिंक विवाहाला मान्यता देणारा कायदा मंजूर केला. ऑस्ट्रिया, ब्राझील, कोलंबिया, कोस्टा रिका, इक्वाडोर, मेक्सिको, स्लोव्हेनिया, दक्षिण आफ्रिका, तैवान आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या 10 देशांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रीय स्तरावर समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता दिली. दक्षिण आफ्रिका आणि तैवान या 2 देशांनी समलिंगी विवाहाला कायदेशीर ठरवून न्यायालयाने आदेश जारी केल्यानंतर समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा कायदा केला.


'या' देशांमध्ये समलैंगिक विवाहाला मान्यता


क्युबा, अंडोरा, स्लोव्हेनिया, चिली, स्वित्झर्लंड, कॉस्टारिका, ऑस्ट्रिया, तैवान, इक्वेडोर, बेल्जियम, ब्रिटन डेन्मार्क, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, आइसलँड, आयर्लंड, लक्झेंबर्ग, माल्टा, नॉर्वे, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन, मेक्सिको दक्षिण आफ्रिका, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कोलंबिया, ब्राझील, अर्जेंटिना, कॅनडा, न्युझीलँड, नेदरलँड, पोर्तुगाल, उरुग्वे या देशांचा समावेश होतो.


'या' देशांमध्ये समलैंगिक विवाह केल्यास फाशी


दरम्यान, जगात असेही काही देश आहेत, जिथे समलिंगी विवाह केल्यास कायद्यानुसार शिक्षेची तरतूद आहे. पाच देशांमध्ये समलैंगिक संबंधांसाठी फाशीची शिक्षा दिली जाऊ शकते. यामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिराती, कतार आणि मॉरिटानिया या देशांमध्ये समलैंगिक विवाह केल्यास फाशीची शिक्षा दिली जाते.


महत्वाच्या इतर बातम्या :


Same Sex Marriage : समलिंगी विवाह संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल; कोणालाही लग्न करण्यापासून रोखू शकत नाही, पण...