ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
तृणमुल फुटीचा सगळा फुटीचा कार्यक्रम सेम टू सेम शिवसेना स्टाईलनेच झाला आहे. शिवसेना फुटल्यानंतर बाळासाहेब ठाकरे आमचे नेते सांगत एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केली होती.

Trinamool Congress has split into two factions: ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) आपल्या 28 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच औपचारिक फूट पडली आहे. पक्षातून काढून टाकलेले आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांना नेता निवडत 58 बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्ष रथींद्र बोस यांना पाठिंब्याचे पत्र सादर केले. ऋतब्रता यांना विरोधी पक्षनेते म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती. विधानसभा अध्यक्षांनी या फुटीला मंजुरी दिली. त्यांना विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची खोलीही देण्यात आली आहे. जावेद खान, संदीपान साहा आणि सिउली साहा यांची उपनेतेपदी, तर अख्रुझमान यांची मुख्य प्रतोद (चीफ व्हिप) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
देशातील तीन पक्ष सेम स्टाईलने फुटले
हा सगळा फुटीचा कार्यक्रम सेम टू सेम शिवसेना स्टाईलनेच झाला आहे. शिवसेना फुटल्यानंतर बाळासाहेब ठाकरे आमचे नेते सांगत एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केली होती. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मानण्यास नकार दिला होता. शिवसेना फुटल्यानंतर जो घटनाक्रम झाला त्याच पातळीवरचा घटनाक्रम तृणमुलमध्ये झाला आहे. त्यामुळे आणखी एका प्रादेशिक पक्षाचं अस्तित्व अंधातरी झालं आहे. शिवसेना फुटीतून अजून सावरलेली नाही. राष्ट्रवादीची सुद्धा शरद पवारांच्या देखत दोन शकले झाली. अलीकडेच आपचा राज्यसभेतील अख्खा गट भाजपच्या साथीनं राघव चड्ढा घेऊन गेले. त्यामुळे देशातील चौथा पक्ष आता फुटीर होऊन दोन शकलांमध्ये विभागला आहे.
दरम्यान, या संपूर्ण घडामोडीवर विधानसभा अध्यक्ष किंवा ममता बॅनर्जी यांच्याकडून कोणतेही निवेदन आलेले नाही. आता ममता यांना 22 आमदारांचा पाठिंबा आहे. टीएमसीने 294 पैकी 80 जागा जिंकल्या आहेत. ज्येष्ठ नेते कुणाल घोष यांनी घोषणा केली की, टीएमसी आमदार फिरहाद हकीम यांनी कोलकाताच्या महापौरपदाचा राजीनामा दिला आहे. विरोधी पक्षनेते निवडण्याच्या प्रस्तावावर बनावट सह्या केल्याच्या आरोपानंतर ऋतब्रता बॅनर्जी आणि संदीपान साहा यांना पक्षातून काढून टाकण्यात आले, तेव्हा हा वाद सुरू झाला.
ऋतब्रता यांनी सुवेंदू अधिकारी यांचे आभार मानले
आपल्या पत्रात, बंडखोर गटाने ममता बॅनर्जी यांना पक्षाध्यक्ष म्हणूनच संबोधले आहे. परंतु त्यांनी अभिषेक बॅनर्जी यांचे नेतृत्व आणि विधिमंडळ पक्षाशी संबंधित निर्णय स्वीकारण्यास नकार दिला. आमच्या पक्षाचा आणि जनतेचा अभिषेक बॅनर्जी यांच्याशी कोणताही संबंध नाही. जर काही संबंध असता, तर ते 26 दिवस लपून राहिले नसते, तर बाहेर आले असते. अभिषेकला चोरासारखी मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतरही अभिषेक दावा करत होता की जनता त्याचे रक्षण करेल. शनिवारी दक्षिण सोनारपूरमध्ये अभिषेक यांच्यावर हल्ला झाला. ते निवडणुकीतील हिंसाचारात ठार झालेल्या एका कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांना भेटायला गेले होते.
दोन-तृतीयांशपेक्षा जास्त आमदार
टीएमसीचे दोन-तृतीयांशपेक्षा जास्त आमदार आमच्यासोबत आहेत. इतर दोन आमदारांनीही आपला पाठिंबा दर्शवला आहे. विधानसभेच्या अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला मान्यता दिली असून विरोधी पक्षनेत्यांसाठी कार्यालयाची खोलीही दिली आहे. आमच्याकडे बहुमत आहे. संसदीय परंपरेनुसार, आम्ही विधानसभेतील खरे आणि मुख्य विरोधी पक्ष आहोत.
मी बॉस नाही
मी बॉस नाही. माझा बॉसगिरीवर विश्वास नाही. माझा 'आम्ही'वर विश्वास आहे. सर्व निर्णय चर्चेनंतर घेतले जातील.
आम्ही सरकारला विरोध करू
आम्हाला चुकीची वाटणाऱ्या सरकारी धोरणांना आम्ही विरोध करू, पण केवळ विरोधासाठी विरोध करणार नाही. आम्ही सरकारच्या चांगल्या निर्णयांचे कौतुकही करू.
सुवेंदू अधिकारी यांचे आभार
नवन्ना येथे झालेल्या प्रशासकीय बैठकीसाठी विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलावल्याबद्दल बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे आभार मानले. कोलकाता, हावडा आणि उत्तर 24 परगणा येथील अनेक बंडखोर आमदार बैठकीला उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके





















