एक्स्प्लोर

Mamata Banerjee on Murshidabad violence: योगी सर्वात मोठे भोगी, मुर्शिदाबाद दंगलीत भाजप बीएसएफचं संगनमत, बांगलादेशी घुसखोर बोलवून दंगल केली; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप

Mamata Banerjee on Murshidabad violence: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी मंगळवारी बंगाल हिंसाचारावर म्हटले होते की, बंगाल जळत आहे आणि मुख्यमंत्री गप्प आहेत. दंगलखोरांना शांतीदूत म्हणत आहेत.

Mamata Banerjee on Murshidabad violence: पश्चिम बंगालच्या (Murshidabad violence) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी (Mamata Banerjee on Yogi Adityanath) इमामांच्या (Mamata meets Imams) मेळाव्यात बोलाताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर घणाघाती प्रहार केला. त्या म्हणाल्या की, ते मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत आहेत, पण ते सर्वात मोठे भोगी आहेत. महाकुंभात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. उत्तर प्रदेशात झालेल्या चकमकीत अनेक लोक मारले गेले. योगी लोकांना रॅली काढू देत नाहीत, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी योगींना फटकारले. वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात (Waqf Act protests) झालेल्या निदर्शनादरम्यान मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर (Murshidabad violence), ममता यांनी कोलकात्याच्या नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये सांगितले की, मुर्शिदाबादमधील दंगल पूर्वनियोजित होती. यामध्ये भाजप, बीएसएफ आणि केंद्रीय यंत्रणांचा संगनमत होते. बांगलादेशी घुसखोरांना देशात आमंत्रित करून हे दंगली भडकवण्यात आल्या.

बंगाल जळत आहे आणि मुख्यमंत्री गप्प आहेत

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी मंगळवारी बंगाल हिंसाचारावर म्हटले होते की, बंगाल जळत आहे आणि मुख्यमंत्री गप्प आहेत. दंगलखोरांना शांतीदूत म्हणत आहेत. जे हट्टी आहेत ते शब्द ऐकणार नाहीत. दंगलखोरांसाठी लाठी हा एकमेव उपाय आहे. ममतांनी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली दंगलखोरांना स्वातंत्र्य दिले आहे. ममता म्हणाल्या की, मुर्शिदाबादमधील हिंसाचारात (Mamata accuses BJP) बांगलादेशचा सहभाग असल्याची बातमी मला मिळाली आहे. सीमा सुरक्षा ही बीएसएफची भूमिका नाही का? राज्य सरकार आंतरराष्ट्रीय सीमेचे रक्षण करत नाही. याची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली पाहिजे.

तर त्यांच्या घरांवर हल्ले झाले नसते

त्यांनी पंतप्रधान मोदींना वक्फ कायदा थांबवण्याची आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील गृहमंत्रालय नियंत्रणात ठेवण्याची मागणी केली. ममता म्हणाल्या की, मी पंतप्रधानांना विनंती करेन की त्यांनी अमित शाहांवर नियंत्रण ठेवावे, ते त्यांचा राजकीय अजेंडा पूर्ण करण्यासाठी देशाचे नुकसान करत आहेत.

बीएसएफच्या भूमिकेची चौकशी सुरू करण्याचे निर्देश 

ममता म्हणाल्या की, विरोधकांचा आरोप आहे की वक्फ हिंसाचारात तृणमूल काँग्रेसचा सहभाग आहे. जर आपले नेते हिंसाचारात सहभागी झाले असते तर त्यांच्या घरांवर हल्ले झाले नसते. त्यांनी आरोप केला की भाजप बंगालला बदनाम करण्यासाठी इतर राज्यांमधील हिंसाचाराचे व्हिडिओ प्रसारित करण्यासाठी काही माध्यम संस्थांना पैसे देत आहे. मुर्शिदाबाद हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई ममता बॅनर्जी यांनी जाहीर केली. तसेच राज्याच्या मुख्य सचिवांना बीएसएफच्या (BSF involvement) भूमिकेची चौकशी सुरू करण्याचे निर्देश दिले.

दावा, मुर्शिदाबाद हिंसाचारात बांगलादेशी कट्टरपंथींचा सहभाग

दरम्यान, काल, मुर्शिदाबाद हिंसाचारात बांगलादेशी कनेक्शन समोर आले. गुप्तचर अहवालांचा हवाला देत वृत्तसंस्था पीटीआयने म्हटले आहे की हा हल्ला बांगलादेशातील दोन कट्टरपंथी संघटना - जमात-उल मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) आणि अन्सारुल्ला बांगला टीम (एबीटी) यांनी केला आहे. हिंसाचारात वडील आणि मुलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. एका आरोपीला बीरभूम आणि दुसऱ्याला बांगलादेश सीमेवरून पकडण्यात आले आहे. कालू नदाब आणि दिलदार नदाब अशी त्यांची नावे आहेत. मुर्शिदाबाद हिंसाचारात 3 जणांचा मृत्यू झाला, तर 15 पोलिस जखमी झाले. आतापर्यंत 300 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. हिंसाचारग्रस्त भागात केंद्रीय सुरक्षा दलाचे 1600 जवान तैनात आहेत.

बीएसएफ हटवला तर समस्या निर्माण होईल

पाच दिवसांच्या हिंसाचारानंतर मुर्शिदाबादमध्ये परिस्थिती सामान्य झाली आहे. प्रशासनाने सांगितले की, हिंसाचारग्रस्त धुलियान शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. लोक आता हळूहळू कामावर परतत आहेत. धुलियानहून स्थलांतरित झालेले 500 हून अधिक लोक आता परत येत आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार

व्हिडीओ

Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
Embed widget