Bihar Assembly Election : सुप्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूरने (Maithili Thakur) भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जायसवाल यांच्या उपस्थितीत तिला पक्षाची सदस्यता देण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, अलीनगर विधानसभा मतदारसंघातून (Alinagar Constituency) मैथिली ठाकूरला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याआधी तिला बेनीपट्टी (Benipatti) मतदारसंघातून तिकीट मिळेल अशी चर्चा होती, मात्र पहिल्या यादीत तिचे नाव नव्हते.
Maithili Thakur Joins BJP : भाजपात नवा सूर, मैथिली ठाकूरचा प्रवेश
लोकसंगीतातून ओळख निर्माण केलेल्या मैथिली ठाकूरच्या प्रवेशामुळे भाजपमध्ये नवा उत्साह दिसून येत आहे. तिच्यासोबत भभुआ (Bhabhua) येथील राजदचे (RJD) आमदार भरत बिंद यांनीही भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जायसवाल म्हणाले की, "विपक्ष आता नैराश्यात आहे. जनतेचा विश्वास भाजपावर आणि एनडीएवर अधिक बळकट झाला आहे."
NDA Seat Distribution Details : एनडीए जागावाटपाचा तपशील
भाजप (BJP) – 101 जागा
जदयू (JDU) – 101 जागा
लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) (LJP-Ram Vilas) – 29 जागा
राष्ट्रीय लोक मोर्चा (RALOMO) – 6 जागा
हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM) – 6 जागा
Bihar Assembly Election Date : बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान
केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानुसार, बिहारमध्ये 243 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबरला होणार आहे.
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान 11 नोव्हेंबरला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 122 जागांवर होणार आहे. तर, मतमोजणी 14 नोव्हेंबरला होणार आहे.
Bihar Vidhansabha Seats Detail : बिहारचे पक्षीय बलाबल
एकूण सदस्यसंख्या (Total Seats) – 243
राष्ट्रीय जनता दल (RJD) – 79
भारतीय जनता पक्ष (BJP) – 78
जनता दल (युनायटेड) – JD(U) – 45
काँग्रेस (Congress) – 19
CPI (Marxist–Leninist) Liberation – 12
हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM-Secular) – 4
CPI – 2
CPI (M) – 2
AIMIM – 1
अपक्ष आमदार (Independent MLA) – 1
ही बातमी वाचा: