मुंबई: लोकसभेतील घुसखोरीची घटना घडल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी तातडीनं पोलीस महासंचालकांना फोन केला आहे. या घटनेतील आरोपी महाराष्ट्रातील असल्यानं त्यांची लवकरात लवकर माहिती घ्या असे निर्देश फडणवीसांनी दिले. तसेच लोकसभेतील घटनेनंतर विधिमंडळ सचिवांनी सुरक्षेचा आढावा घेतला असून विधिमंडळ परिसरातील सुरक्षा कडक करण्याचे सचिवांनी आदेश दिले आहेत.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली असून त्यावेळी सुरक्षेसंबंधित दोन घटना घडल्या आहेत. एका घटनेमध्ये दोन युवकांनी संसदेच्या परिसरात स्मोक कँडल पेटवण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या घटनेमध्ये दोन तरूणांनी प्रेक्षक गॅलरीतून संदसेद उतरण्याचा प्रयत्न केला. दोन्ही घटनेतील तरुणांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यापैकी एका घटनेतील तरूण अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील असल्याचं समोर आलं आहे.
संसदेत घडलेल्या या प्रकारानंतर आता खबरदारीचा उपाय म्हणून राज्याच्या विधान भवन परिसरातील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद उपसभापती यांनी देखील विधिमंडळ परिसरातील सुरक्षेबाबत विधीमंडळ सचिवांकडून माहिती घेतली. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलीस महासंचालकांना यासंबंधित निर्देश दिले आहेत.
संसदेत झालेल्या घटनेचे पडसाद हे राज्याच्या अधिवेशनातही उमटल्याचं दिसून आलं. यावर चर्चा करताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, या प्रकरणातील अमोल शिंदे नावाचा मुलगा महाराष्ट्रातील आहे. त्यामुळे हे आंदोलन मराठा आरक्षण संदर्भात आहे का याची माहिती घेतली पाहिजे. संसदेत झालेल्या घटनेनंतर विधानभवनाच्या सुरक्षेसंदर्भात सुद्धा पाऊले उचलली गेली पाहिजेत. ज्यांनी घोषणाबाजी केली किंवा जे संसदेत घुसले ते कुठल्या संघटनेचे होते हे सुद्धा पहावे लागेल. त्यांचं म्हणणं समजून घ्यावे लागेल आणि जर ते मराठवाड्यातील किंवा महाराष्ट्रातील असतील तर इथे सुद्धा अशा प्रकार घडू शकतो. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनीसुद्धा तशा प्रकारच्या सूचना दिले आहेत आणि कमीत कमी दोन पासेस विधानभवन परिसरात येताना प्रत्येक सदस्याच्या सोबत दिली जातील.
कोण आहे नीलम आणि अमोल शिंदे?
अमोल शिंदे हा लातूल जिल्ह्यातील चाकुर तालुक्यातील थोरली झरी गावचा आहे. त्याचे शिक्षण 12 वी असून तो नोकरीच्या सोधात आहेत. त्याचे आई वडील शेतात मजुरी करतात तर एक भाऊ पनवेलला शिक्षा चालवतो. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी
नीलम ही हरियाणातील जिंद येथील रहिवासी आहे. तिचे वडील उचाना येथे मिठाईचे दुकान चालवतात. नीलम हीडाव्या विचारसरणीच्या असून शेतकरी चळवळीतही ती सक्रिय होती. त्याचसोबत नीलम हरियाणा सिव्हिल सर्व्हिसची तयारी करत होती.
25 नोव्हेंबर रोजी नीलमने घरी जात असल्याचं सांगून पीजी सोडलं होतं.
ही बातमी वाचा :