बडोद्यातील हाय-प्रोफाईल उद्योगपतींचाही या 250 जणांमध्ये समावेश असल्याची माहिती मिळते आहे. बडोद्याजवळील सेवासी गावातील ‘अखंड’ या अलिशान फार्महाऊसवर दारुची पार्टी सुरु होती. लग्नाच्या निमित्ताने ही दारु पार्टी आयोजित केल्याची माहिती मिळते आहे.
पोलिसांना या पार्टीबाबत माहिती मिळताच छापा मारण्यात आला. अचानक छापा मारल्याने एकच गोंधळ उडाला. या छाप्यात पोलिसांनी काही महिलांनाही अटक केली आहे. छाप्यादरम्यान तेथील उद्योगपतींनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्नही केला.
फार्महाऊसवरुन पोलिसांनी 20 डबे दारु जप्त केली आहे. तर अटक केलेल्या सर्वांचे ब्लड सॅम्पल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.