Supreme Court of India : भारताचे मुख्य सरन्यायाधीश यांच्यासह काही सिनिअर न्यायाधीशांचे कोर्टरुम आता पूर्णपणे हायटेक झाले आहे. सुप्रिम कोर्टातील या कोर्टरुमला डिजिटल आणि नव्या पद्धतीने सजवण्यात आले आहे. 70 वर्षांपासून कोर्टाच्या भींतीवर रेखाटलेल्या याचिका आणि निर्णायाची पारंपारिकपणा संपुष्टात आला. 42 दिवसाच्या सुट्टीनंतर कोर्ट पुन्हा एकदा सुरु झाले. सुप्रीम कोर्टामध्ये आता एलईडी व्हीडियो वॉल आणि अधुनिक स्पीकर सिस्टम यासारख्या सोयी सुविधा आहेत. त्याशिवाय न्यायाधीश आणि वकिलांना मोफत वायफायची सुविधाही मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या नवीन सुविधांमुळे न्यायालयाचे वातावरण तांत्रिकदृष्ट्या प्रगत झाले आहे.
ई-पहलच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाच्या काही कोर्टरुम डिजिटल झाल्या आहेत. कोर्टात येणारे वकील, पत्रकार आणि इतर स्टेक होल्डर्स यांना मोफत वायफाय देण्यात येणार आहे. कोर्टारुम डिजिटल झाल्याचा अनेकांना फायदा होईल, वायफायमुळे लोकांना माहिती मिळेल आणि कार्यवाहीशी कनेक्ट राहण्यास मदत मिळेल.
कोर्टरुमधील व्हिज्युअल एक्सपिरियन्स आणखी चांगला होण्यासाठी एलईडी व्हीडिओची सोय करण्यात आली आहे.. हाय रिझॉल्यूशन डिस्प्ले कॅमरा फीड आणि मल्टीमीडिया कंटेंटसाठी एक प्लेटफॉर्म म्हणून काम करेल. यामुळे कोर्टात उपस्थित असणाऱ्यांना चांगला अनुभव मिळेल. Document Camera चीही सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे कायदेशीर वस्तू आणि पुरावे एकत्र करणे सुलभ करते. हा प्रगत कॅमेरा भौतिक दस्तऐवज अधिक स्पष्टतेसह कॅप्चर करतो.
सुप्रीम कोर्टातील पाच कोर्ट रुम हायटेक झाल्या आहेत. कोर्टरुमध्ये फाईल्स आणि पुस्तके दिसणार नाहीत. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचे हे कोर्ट अधुनिकतेकडे नेहण्याचे पहिले पाऊल होय. कोर्टात मोठमोठे एलसीडी, एलईडी लगावण्यात आले आहेत. वकिलांनाही हायटेक सुविधा देण्यात आल्या आहेत. न्यायालयीन पुस्तकेही डिजिलट रुपात आणली आहेत. यापुढे न्यायाधीशांना पुरावेही डिजिलट स्वरुपात दाखवले जाणार आहेत.
42 दिवसांच्या सुट्टीनंतर आज सर्वोच्च न्यायालय सुरु झालं. सोमवारी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी कोर्टात मोफत वायफाय सुरु करण्यात आल्याचे सांगितले.