Covid-19 in India : देशात अद्यापही कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 3 हजार 205 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे 31 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सध्या देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही 19 हजार 509 आहे.
देशात हळूहळू कोरोना रुग्णांचा धोका वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. कालच्यापेक्षा आज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काल देशात 2 हजार 568 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर 20 जणांचा मृत्यू झाला होता. आत्तापर्यंत देशात कोरोना रुग्णांची संख्या 4 कोटी 30 लाख 88 हजार 118 वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत देशभरात कोरोनामुळे 5 लाख 23 हजार 920 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 2 हजार 802 हून अधिक रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर दैनंदीन पॉझिटीव्हीटी दर हा 0.98 टक्के आहे. तर साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर हा 0.76 टक्के नोंदवला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 189.48 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.
दरम्यान, गेल्या दोन वर्षांत कोरोना संसर्गामुळे संपूर्ण जग हादरले आहे. एकेकाळी देशात कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात येत असतानाच पुन्हा एकदा आता धोक्याची घंटा वाजत आहे. दरम्यान, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांवर आता नवे संकट उभे ठाकले आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, ओमिक्रॉन सब-व्हेरियंट XE च्या देशातील पहिल्या प्रकरणाची पुष्टी भारतीय SARS-CoV2 जेनोमिक्स सिक्वेन्सिंग कन्सोर्टियम (INSACOG), सरकारच्या पुढाकाराने करण्यात आली आहे. जे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय चाचणी प्रयोगशाळांचे नेटवर्क आहे. कोविडचा XE सब-व्हेरिएंट हा संसर्ग ओमिक्रॉनमुळे होणाऱ्या संसर्गापेक्षा वेगळा नाही. नवा व्हेरिएंट हा ओमिक्रॉनच्या सध्याच्या BA.2 प्रकारापेक्षा फक्त 10 टक्के जास्त संसर्गजन्य असल्याचे आढळून आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- XE Variant in India : कोरोनाचा XE व्हेरिएंट आता भारतात? अधिकारी म्हणाले, काळजी करू नका, पण...
- Maharashtra Corona Update : राज्यात मंगळवारी 182 रुग्णांची नोंद तर 170 रुग्ण कोरोनामुक्त