एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana: अहो, 1500 अन् 2100 रुपये सोडा, बिहारमध्ये लाडक्या बहिणींना 10 हजार मिळणार, नेमकी काय योजना?

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजना लोकप्रिय ठरली असताना, आता बिहार सरकारने महिलांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे.

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजना (Ladki Bahin Yojana) लोकप्रिय ठरली असताना, आता बिहार सरकारने (Bihar Government) महिलांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. 'मुख्यमंत्री महिला रोजगार योजना'(Mukhyamantri Mahila Rojgar Yojana) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या नव्या उपक्रमाद्वारे राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 75 लाख महिलांना प्रत्येकी 10,000 रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, या आर्थिक सहाय्याचा पहिला हफ्ता आज (26 सप्टेंबर 2025) त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

PM मोदी आणि नितीश कुमार यांचा विशेष संवाद (PM Modi and Nitish Kumar)

या कार्यक्रमानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार या दोघांचा महिलांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद होणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये आणि गावांमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये महिला थेट हा संवाद ऐकू शकतील. मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा मुख्य हेतू म्हणजे राज्यातील महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांना दीर्घकालीन रोजगार निर्माण करण्यास मदत करणे, हा आहे.

1 कोटी 11 लाख महिलांनी केला अर्ज (Bihar Mukhyamantri Mahila Rojgar Yojana)

या योजनेसाठी आतापर्यंत 1 कोटी 11 लाख महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी, पात्र ठरलेल्या 75 लाख महिलांना पहिल्या टप्प्यात आर्थिक मदतीचा लाभ देण्यासाठी संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

10 हजारानंतर मिळणार 2 लाख रुपयांची अतिरिक्त मदत (Bihar Mukhyamantri Mahila Rojgar Yojana)

या योजनेचा उद्देश फक्त तात्पुरती मदत देण्यापुरता मर्यादित नाही. पहिल्या हफ्त्यानंतर, महिलांनी रोजगारासाठी घेतलेली पुढील पावले, त्यांची तयारी आणि उपक्रमांचा आढावा घेतल्यानंतर 2 लाख रुपयांची अतिरिक्त मदत दिली जाणार आहे. या मदतीचा उपयोग महिला शेती, पशुपालन, शिलाई मशीन खरेदी, किंवा इतर लघुउद्योग सुरू करण्यासाठी करू शकतील. यामुळे महिलांना आपल्या पायावर उभं राहता येईल. 

अर्जाची प्रक्रिया आणि पात्रतेचे निकष (Bihar Mukhyamantri Mahila Rojgar Yojana)

या योजनेत सहभागी होण्यासाठी काही आवश्यक निकष निश्चित करण्यात आले आहेत. लाभार्थी महिलेने जीविका स्वयं सहायता समुहासोबत जोडलं जावं. या समूहला जोडल्यानंतरच महिला मुख्यमंत्री महिला रोजगार योजनासाठी अर्ज करु शकणार आहेत. ही प्रक्रिया पूर्णपणे निशुल्क असणार आहे. या योजनेत अर्ज करण्यासाठी सरकार किंवा अधिकाऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, असं सरकारने स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा 

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे लाटणाऱ्या 8 हजार सरकारी कर्मचाऱ्यांना दणका, 15 कोटींची रक्कम वसूल होणार

महत्त्वाच्या बातम्या

Maruti WagonR BioFlex Flex Fuel Car: 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
Yusuf Pathan: खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
दाजीने धाकली मेव्हणी घरी राहायला येताच आंघोळीचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली अन् नंतर ब्लकमेल करत शरीर संबंधही ठेवले, गर्भवती होताच..
दाजीने धाकली मेव्हणी घरी राहायला येताच आंघोळीचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली अन् नंतर ब्लकमेल करत शरीर संबंधही ठेवले, गर्भवती होताच..
Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेंना कानशिलात लगावली; जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेंना कानशिलात लगावली; जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना

व्हिडीओ

Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Sanjay Raut Delhi: आई,साईबाबा तर कोणी मुलाची शपथ घेतली; खासदारांनी ठाकरेंना शब्द दिल्याचा दावा
TMC MP Merged With Small Party : आता छोटा पक्ष, नंतर मोठं लक्ष्य | ABP Majha Special Report
Eknath Shinde Vs Ganesh Naik : नाईक Vs शिंदे, पत्रिकेवरून नवा संघर्ष! | ABP Majha Special Report
Chhatrapati Sanbhajinagar RTO : एक ऑडिओ क्लिप... आणि RTO चा कारभार चव्हाट्यावर? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aanchal Mamidwar : मृतदेहासोबत लग्न, तिथंच राहण्याचं वचन; नंतर घर सोडलं, भावावर आरोप, आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट, सक्षमच्या कुटुंबीयांनी आंचलचे ते मेसेज दाखवले, बाळा....
मृतदेहासोबत लग्न, तिथंच राहण्याचं वचन; नंतर घर सोडलं, भावावर आरोप, आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट, सक्षमच्या कुटुंबीयांनी आंचलचे ते मेसेज दाखवले, बाळा....
'स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही...'; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले...
'स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही...'; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले...
Nashik Vidhan Parishad Election 2026: ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?
ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?
Buldhana News: मेहकरचा गड महाविकास आघाडीच्या ताब्यात! काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा ठाकरे गटाला खुला पाठिंबा; एकनाथ शिंदेंना मोठा धक्का
मेहकरचा गड महाविकास आघाडीच्या ताब्यात! काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा ठाकरे गटाला खुला पाठिंबा; एकनाथ शिंदेंना मोठा धक्का
Monsoon Rain Updates: मान्सून कोकणातच अडकला, मुंबईत कधी येणार? उशीर झाल्यास मुंबईकरांवर पाणी कपातीचं मोठं संकट
मान्सून कोकणातच अडकला, मुंबईत कधी येणार? उशीर झाल्यास मुंबईकरांवर पाणी कपातीचं मोठं संकट
Shivsena Crisis VIDEO : ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
Sangli Crime: वेदांत बंडगर हत्याप्रकरणात खासदार विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
वेदांत बंडगर हत्याप्रकरणात विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
Pawanraje Nimbalkar Case: पवनराजे निंबाळकर प्रकरणाची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी; तब्बल 20 वर्षानंतर निकाल लागण्याची शक्यता; धाराशिवमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी; तब्बल 20 वर्षानंतर निकाल लागण्याची शक्यता; धाराशिवमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त
Embed widget