एक्स्प्लोर
Advertisement
कुलभूषण यांच्या आई, पत्नी भारतात, सुषमा स्वराज यांच्याशी भेट
यावेळी त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव जयशंकरही उपस्थित होते.
नवी दिल्ली : कथित हेरगिरीच्या आरोपावरुन पाकिस्तानमध्ये कैद असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नी यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव जयशंकरही उपस्थित होते.
इस्लामाबादेत कुलभूषण यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या आई आणि पत्नी आज पहाटे दिल्लीला परतले. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेले माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांची त्यांच्या कुटुंबीयांनी काल पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात भेट घेतली. त्यांची काचे आडून इंटरकॉमच्या माध्यमातून सुमारे अर्धात तास भेट झाली.Mother and wife of #KulbhushanJadhav leave from residence of EAM Sushma Swaraj in Delhi pic.twitter.com/FFWIb4HcvJ
— ANI (@ANI) December 26, 2017
कुलभूषण जाधवांच्या कथित कबुलनाम्याच्या व्हिडीओत 102 कट्स
21 महिन्यानंतर जाधव कुटुंबियांना भेटले!
हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव 25 डिसेंबरला आई आणि पत्नीला भेटले. परंतु पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात या भेटीसाठी खास काचेच्या भिंतींची इंटरकॉम रुम तयार करण्यात आली होती. कुलभूषण जाधव यांना काचेची एका बाजूला बसले होते, तर दुसऱ्या बाजूला त्यांची आई आणि पत्नी बसली होती. तिघांच्या मध्ये असलेल्या काचेच्या भिंतीमधून पाकिस्तानचा अमानवीय चेहरा समोर आला.
जाधवांच्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती
दरम्यान, पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. पण आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या याचिकेनंतर या निर्णयावर स्थगिती देण्यात आली आहे.
स्पेशल रिपोर्ट : पाकिस्तानने 'असं' अडकवलं कुलभूषण जाधवांना
कोण आहेत कुलभूषण जाधव?
कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतातून त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचे सांगलीतील असून, सध्या मुंबईत वास्तव्यास आहे.
कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत.
जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे.
‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती.
कुलभूषण जाधव आई-पत्नीला भेटणार!
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement