नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली सीमेवर गेल्या 70 दिवसांहून अधिक काळ शेतकरी आंदोलन सुरू आहे. दरम्यान, भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत त्यांनी 92 वर्षीय सेवा चंद बालयान यांना आपल्या खांद्यावर घेतलं आहे. गाझीपूर सीमेवरूल हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सेवाचंद बालयान हे मुझफ्फरनगरमधील असून त्यांनी शेतकरी आंदोलनात भाग घेतला आहे.


सेवाचंद बालयान यांचा राकेश टिकैत यांना आशीर्वाद



गाझीपूर सीमेवर भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी एक नवीन सूत्र दिले आहे. टिकैत म्हणाले की, प्रत्येक गावातून एका ट्रॅक्टरवर 15 माणसे 10 दिवसांचा वेळ घेऊन यावेत. अशा प्रकारे प्रत्येक शेतकरी या आंदोलनात सहभागी होईल आणि नंतर गावात परत जाऊन शेतीही करेल.


शेतकरी संघटनांचे नेते सरकारशी चर्चा करण्यासाठी नेहमीच तयार आहेत. मात्र, सरकारला चर्चा करायची नाहीय. सरकार या आंदोलनाला दीर्घकाळ चालू देण्याच्या मनस्थितीत नाही. मात्र, आपल्याला हे आंदोलन दीर्घकाळ चालवायचे आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी हा फॉर्म्युला आहे. यामुळं प्रत्येक शेतकरी हा आंदोलनात सहभाग घेईल आणि आंदोलन दीर्घकाळ चालू शकेल, असं टिकैत यांनी म्हटलं आहे.


Farmer Protest : 'एक ट्रॅक्टर, 15 शेतकरी, 10 दिवस!', आंदोलन दीर्घकाळ चालवण्यासाठी राकेश टिकैत यांचा नवा फॉर्म्युला


या सूत्रानुसार, गावांमधील लोकं आंदोलनात जास्तीत जास्त येतील. प्रत्येक गावातून 15 शेतकरी 10 दिवसांसाठी येतील. त्यानंतर दुसऱ्या 15 लोकांचा समूह येईल. त्यानंतर आधीपासून आंदोलनात असलेले शेतकरी आपल्या गावी जाऊन शेती करु शकतील, असं टिकैत म्हणाले.


कंगना रनौत देशप्रेमी आणि शेतकरी देशद्रोही? शिवसेना खासदार संजय राऊत यांचा केंद्रावर हल्लाबोल


सरकारसोबतच्या बैठका निष्फळ
केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमधील 11 फेऱ्यांमध्ये बैठका झाल्या आहेत. मात्र, सर्व बैठका निष्फळ ठरल्या आहेत. शेतकऱ्यांनी सरकारची ऑफर नाकारली आहे. तीनही कृषी कायदे रद्द करावे या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. तर, पंतप्रधान मोदी म्हणाले की शेतकरी त्यांच्यापासून फक्त एक फोन कॉल दूर आहे.