मुंबई : मुगाची खिचडी राष्ट्रीय खाद्य घोषित झाल्याचं वृत्त चुकीचं असल्याची माहिती केंद्री अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी दिली आहे. खिचडी राष्ट्रीय खाद्य घोषित होणार असल्याचं वृत्त बुधवारी प्रसिद्ध झालं होतं.
परंतु अशी कोणतीही घोषणा करण्याचा इरादा नसल्याचं स्पष्टीकरण हरसिमरत कौर बादल यांनी दिलं आहे. त्यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे.
https://twitter.com/HarsimratBadal_/status/925775455650701313
येत्या 4 नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या खाद्य दिनी प्रसिद्ध शेफ संजीव कपूर 800 किलो पेक्षा जास्त मुगाची खिचडी बनवून विश्वविक्रम करणार आहेत. याद्वारे भारतीय खाद्याची जगभरात ख्याती व्हावी असा याचा उद्देश आहे. मात्र याचवेळी मुगाच्या खिचडीला राष्ट्रीय खाद्य जाहीर करण्यात येईल, अशी अफवा पसरली.
स्वस्त आणि मस्त मुगाच्या खिचडीला आता राष्ट्रीय खाद्याचा दर्जा
आता राष्ट्रीय खाद्य घोषित होणार आहे. येत्या 4 नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या खाद्य दिनी दिल्लीत मुगाच्या खिचडीला हा दर्जा दिला जाणार आहे.
डाळ, तांदूळ आणि कमीत कमी मसाल्यांमध्ये तयार होणारी ही डिश आहे. मुगाची खिचडी ही चविष्ट, कमी वेळात आणि खर्चात तयार होते. शिवाय श्रीमंत असो वा गरीब, मुगाची खिचडी सर्वांनाच आवडते.
4 नोव्हेंबरला 800 किलो मुगाची खिचडी बनवण्यासाठी एक हजार लिटर आणि सात फूट व्यासाची भलमोठी कढई वापरण्यात येणार आहे. शेफ संजीव कपूर हे ग्रेड इंडिया फूड स्ट्रीटचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असून 3 नोव्हेंबरला या तीन दिवसीय कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.