VD Satheesan Net Worth: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचीच तीन ठिकाणी सरशी झाली मात्र एक राज्य असे आहे, जिथे काँग्रेसची सत्ता आली आहे. केरळममध्ये काँग्रेस प्रणित यूडीएफने विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवले आहे. त्यानंतर, गेल्या अनेक दिवसांपासून येथे मुख्यमंत्रिपदाच्या नावाची चर्चा सुरू होती. आता एक नाव निश्चित करण्यात आले आहे, अनेक चर्चानंतर, केरळमच्या मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस नेते व्ही.डी. सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
व्ही.डी. सतीशन यांची नेटवर्थ किती?मुख्यमंत्री होणाऱ्या व्ही.डी. सतीशन यांच्या नेटवर्थचीही चर्चा सुरूआहे. 2026 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, सतीशन सुमारे 6 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत. प्रतिज्ञापत्रानुसार, व्ही.डी. सतीशन आणि त्यांची पत्नी लक्ष्मीप्रिया यांच्याकडे मिळून 6.69 कोटी रुपयांची मालमत्ता आहे, ज्यामध्ये जंगम आणि स्थावर दोन्ही मालमत्तांचा समावेश आहे.
सतीशन यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात 53.82 लाख रुपयांची जंगम मालमत्ता घोषित केली आहे. त्यांच्याकडे 64,000 रुपये रोख, 25,000 रुपयांचे बँक शेअर्स आणि 35 ग्रॅम सोने आहे. सतीशन यांच्या स्थावर मालमत्तेमध्ये जमीन आणि निवासी मालमत्तेचा समावेश आहे, ज्याची किंमत 2.42 कोटी रुपये आहे. यामध्ये परवूर आणि नेत्तूरमधील वारसा हक्काने मिळालेल्या आणि स्वतः खरेदी केलेल्या मालमत्तांचा समावेश आहे.
पत्नी-मुलीकडे आहे इतकी मालमत्तासतीशन यांच्या पत्नी लक्ष्मीप्रिया यांच्या जंगम मालमत्तेची किंमत 68.45 लाख रुपये आहे. ज्यात रोख, बँक बॅलन्स, सोने आणि शेअर्सचाही समावेश आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, लक्ष्मीप्रिया यांच्याकडे 1,128 ग्रॅम सोने आहे. याशिवाय, त्यांच्या पत्नीला सुमारे 1.85 कोटी रुपयांची जमीन वारसा हक्काने मिळाली आहे. या प्रतिज्ञापत्रात असेही म्हटले आहे की, कुटुंबाकडे त्यांच्या मुलीच्या नावावर 9.61 लाख रुपयांची कार आहे.
सतीशन यांच्यावर किती कर्ज आहे?
सतीशन यांच्या देयतेबद्दल बोलायचं झाल्यास, घर आणि कार कर्जासह त्यांच्या नावावर सुमारे 24 लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्या पत्नीवर 17.45 लाख रुपयांचे कर्ज आहे.
दरम्यान, केरळमच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 18 मे रोजी होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.
