कोची : केरळमधील कोचीमध्ये राहणारा 12 वर्षांचा चिमुरडा बाप झाला आहे. 17 वर्षांच्या तरुणीला अपत्यप्राप्ती झाल्यानंतर त्याचं पितृत्व उघड झालं आहे. विशेष म्हणजे हा चिमुरडा भारतातील सर्वात तरुण पिता ठरण्याची शक्यता आहे.


चार महिन्यांच्या बालिकेचे डीएनए रिपोर्ट तपासल्यानंतर 12 वर्षांचा मुलगा तिचा बाप असल्याचं सिद्ध झालं आहे. बालिकेला जन्म देणारी 17 वर्षांची तरुणी ही 12 वर्षांच्या चिमुरड्याची नातेवाईक आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये तिने बाळाला जन्म दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.

बाळाला जन्म दिल्यानंतर तिने लेकीचे वडील कोण आहेत, हे उघड केलं. तिच्या दाव्याला पुष्टी देण्यासाठी तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये डीएनए टेस्ट करण्यात आली. त्यातून ही माहिती समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे दोघंही जण अल्पवयीन असल्यामुळे पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.