बंगळुरु : कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांना दिलेलं 8 हजार 165 कोटींचं पीककर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. सहकारी बँकांकडून प्रत्येक शेतकऱ्याला मिळालेलं 50 हजारांचं कर्ज माफ करण्यात येणार आहे.


कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यासंदर्भात घोषणा केली. कर्नाटकातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी 50 हजार रुपयांचं तात्काळ पीककर्ज मिळणार आहे. उत्तर प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, पंजाबपाठोपाठ आता कर्नाटकातील शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.

'शेतकरी त्रस्त आहेत. पीककर्ज माफ करण्याची वारंवार विनवणी करत आहेत. राज्याच्या तिजोरीवर फरक पडत असला तरी शेतकऱ्यांना उत्तर देणं आमचं कर्तव्य आहे' असं सिद्धरामय्या म्हणाले.

20 जून 2017 पर्यंत कर्ज घेतलेल्या कर्नाटकातील 22 लाख 27 हजार 500 शेतकऱ्यांना यामुळे लाभ मिळणार आहे. 8 हजार 165 कोटी रुपये इतकी कर्जाची एकूण रक्कम माफ होणार आहे. शेतकऱ्यांवर 10 हजार 736 कोटी रुपयांचं कर्ज आहे.