एक्स्प्लोर

Karnataka : लिंगायत समूदायाला हिंदू धर्माचा हिस्सा म्हणू नका, जातीय सर्वेक्षणातून मोठी मागणी समोर

Karnataka Veerashaiva Lingayat : लिंगायत हा वेगळा धार्मिक गट असून त्याला स्वतंत्र ओळख द्या अशी मागणी कर्नाटकात होत आहे. त्यामुळे कर्नाटकातील सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणावरुन नवा वाद होण्याची शक्यता आहे.

बंगळुरू: कर्नाटकमध्ये होणाऱ्या आगामी सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणावरून (Socio-Economic Survey Karnataka) संदर्भात मोठा वाद पेटला आहे. लिंगायत समाजाच्या सर्वोच्च संघटनेने (Apex Body of Lingayat Community) समाजातील सर्व सदस्यांना या सर्वेक्षणात स्वतःची ओळख ही हिंदू म्हणून नव्हे तर ‘वीरशैव-लिंगायत (Veerashaiva-Lingayat)’ म्हणून नोंदवण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.

लिंगायत समाजाचा मुद्दा संवेदनशील ठरत आहे कारण हा समूदाय दीर्घकाळापासून हिंदूंपासून स्वतंत्र धर्म (Separate Religion) म्हणून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. समाजातील मोठा घटक असा दावा करतो की, लिंगायत हा वेगळा धार्मिक गट आहेत आणि त्यांना स्वतंत्र ओळख द्यावी.

जातीय जनगणनेआधी अधिकृत पत्र

येत्या 22 सप्टेंबरपासून कर्नाटकमध्ये जातीय जनगणना (Caste Census Karnataka) सुरू होणार आहे. त्याआधीच वीरशैव-लिंगायत महासभेने हे अधिकृत पत्र जारी करून समाजातील सदस्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांच्या नेतृत्वाखाली, तसेच राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि AICCच्या निर्देशानुसार, कर्नाटकात या जायीत सर्वेक्षणाला सुरुवात होत आहे. सरकारने हे सर्वेक्षण तीन महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

भाजपच्या हिंदू व्होट बँकवर परिणाम

राजकीय विश्लेषकांच्या मते, जर लिंगायत समाजाने आपली स्वतंत्र धार्मिक ओळख अधोरेखित करण्यास सुरुवात केली, तर त्याचा थेट फटका भाजप (BJP) ला बसू शकतो. भाजपचा सर्वात मोठा आधार हिंदू व्होट बँक आहे. मात्र, लिंगायत समाज जर स्वतंत्रपणे नोंदवला गेला, तर भाजपच्या मतांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

लिंगायतांची लोकसंख्या किती?

मागील सर्वेक्षणानुसार कर्नाटकमध्ये लिंगायत समाजाची लोकसंख्या 11 टक्के असल्याचे सांगण्यात आले होते. हा आकडा राज्यातील अनुसूचित जाती (SC) च्या 18 टक्के, तसेच मुस्लिम समाजाच्या 13 टक्क्यांपेक्षा कमी आहे. मात्र, लिंगायत नेत्यांचा ठाम दावा आहे की या समुदायाची लोकसंख्या प्रत्यक्षात 17 टक्के आहे.

उत्तर कर्नाटकमधील लिंगायत नेते एम. बी. पाटील (MB Patil) आणि लक्ष्मी हेब्बाळकर (Laxmi Hebbalkar) यांनी या आकडेवारीवर सार्वजनिकरित्या नाराजी व्यक्त केली होती. त्यांचे म्हणणे आहे की, मागील अहवालातील आकडे चुकीचे असून लिंगायतांची संख्या प्रत्यक्षात खूप जास्त आहे.

या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील आगामी सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण ही केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया नसून, त्याचे दूरगामी राजकीय परिणाम होण्याची शक्यता आहे. वीरशैव-लिंगायत (Veerashaiva Lingayat) समुदायाने जर स्वतंत्र धार्मिक ओळख दाखवण्यास सुरुवात केली, तर राज्याच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल दिसू शकतात.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Kerala Elephant Calf Maya: केरळची 'माया' वनतारामध्ये दाखल; जामनगरच्या प्रवासासाठी खास विमानाची सोय, 18 महिन्यांच्या हत्तीच्या पिल्लावर होणार विशेष उपचार
केरळची 'माया' वनतारामध्ये दाखल; जामनगरच्या प्रवासासाठी खास विमानाची सोय, 18 महिन्यांच्या हत्तीच्या पिल्लावर होणार विशेष उपचार
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
Iran War: तरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार अन् चर्चा करणार! मध्यावधी निवडणुकीत अमेरिकनं जनतेनं ट्रम्पचा हुकुमशाही थाट उतरवला अन् आता इराणच्या सुद्धा चर्चेसाठी 7 अटी
तरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार अन् चर्चा करणार! मध्यावधी निवडणुकीत अमेरिकनं जनतेनं ट्रम्पचा हुकुमशाही थाट उतरवला अन् आता इराणच्या सुद्धा चर्चेसाठी 7 अटी
Embed widget