Karnataka Politics: कर्नाटक विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी डी. के. शिवकुमार यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री शिवकुमार यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. 1 जून रोजी नवीन मंत्र्यांसोबत ते मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात. चार उपमुख्यमंत्र्यांचीही नियुक्ती होण्याची शक्यता आहे. एकाच राज्यात एकाच वेळी इतक्या उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी, 2019 मध्ये, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी पाच उपमुख्यमंत्र्यांसह शपथ घेतली होती. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 28 मे रोजी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी ते दिल्लीत दाखल झाले. तिथे त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली.

Continues below advertisement

बैठकीत काय होणार, नव्या पर्यायांवरही विचार सुरू

काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बंगळूरू विधानसभेत दुपारी 4 वाजता होणार आहे. काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सिंग सुरजेवाला यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सूत्रांनुसार, सिद्धरामय्या स्वतः डी. के. शिवकुमार यांचे नाव सुचवू शकतात. डी. के. शिवकुमार यांच्या नावावर एकमत न झाल्यास, इतर पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो.

नव्या मंत्रिमंडळात सिद्धरामय्या यांचे वर्चस्व असेल 

सूत्रांनुसार, नवीन सरकार 1 जून रोजी शपथ घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच मंत्रिमंडळातही बदल केला जाईल. सध्याच्या मंत्रिमंडळातून दहा मंत्र्यांना हटवले जाऊ शकते. सिद्धरामय्या आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलांचाही शिवकुमार मंत्रिमंडळात समावेश केला जाईल. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीबाबत प्रियांक खरगे म्हणाले, "विधानमंडळ पक्षाची बैठक होण्याची ही पहिली वेळ नाही. या बैठकीत सर्वप्रथम नेत्याची निवड केली जाईल. त्यानंतर याबाबतची माहिती राज्यपालांना पाठवली जाईल."

Continues below advertisement

यानंतर मुख्यमंत्री कोण होणार आणि पुढे काय होणार, हे बैठकीत ठरवले जाईल. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. यासोबतच मंत्रिमंडळही बरखास्त करण्यात आले आहे. आता पुढील सरकारमध्ये कोणाचा समावेश करायचा, हे ठरवण्याची जबाबदारी हायकमांडवर आहे.

इतर महत्वाच्या बातम्याृ