Karnataka CM : कर्नाटकचे मुख्यमंत्री (Chief Minister) सिद्धारमया (Siddaramaiah) यांचे पुत्र यतिंद्र (Yathindra Siddaramaiah) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे कर्नाटकातील राजकारणात नवा भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'माझे वडील त्यांच्या राजकीय जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात आहेत. आता कर्नाटकला प्रगतीशील आणि विचारशील नेतृत्वाची (Progressive leadership) गरज आहे' असं वक्तव्य सिद्धारमय्या यांचे पुत्र यतिन सिद्धारमय्या यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात नेतृत्व परिवर्तनाच्या शक्यतांवर चर्चा रंगू लागली आहे.
विशेष म्हणजे, यतिंद्र यांनी सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांचं नाव घेत, त्यांना पुढील मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार ठरवले. त्यामुळे आता सत्ताधारी काँग्रेस पक्षात (Congress) अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. सतिश जारकीहोळी हे बेळगावचे पालकमंत्री आहेत.
Satish Jarkiholi Next Karnataka CM : 'नोव्हेंबर क्रांती'चे सूतोवाच?
ही घडामोड 22 ऑक्टोबर 2025 रोजी बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील काप्पलगुडी गावात घडली. येथे संत कनकदास यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात यतिंद्र सिद्धारमय्या बोलत होते. त्यांच्या भाषणातील 'नोव्हेंबर क्रांती'चा उल्लेख, नवीन राजकीय समीकरणांचा इशारा मानला जातोय.
DK Shivakumar On Leadership : डी. के. शिवकुमार यांची प्रतिक्रिया
यतिंद्र सिद्धारमय्या यांच्या वक्तव्यावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार (DK Shivakumar) यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "यतिंद्र यांनी नेमकं काय म्हटलं, त्यांचं मत काय आहे ते त्यांनाच विचारा. मी आणि मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी या आधीच स्पष्ट केलं आहे की आम्ही पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य करू आणि एकत्र काम करू."
Yathindra Siddaramaiah Statement : जारकीहोळी कुटुंबाला मोठी संधी मिळणार का?
यतिंद्र सिद्धारमया यांचं वक्तव्य केवळ वैयक्तिक मत आहे की काँग्रेस पक्षाच्या पुढील रणनीतीचा भाग हे स्पष्ट होणं बाकी आहे. मात्र, सध्या कर्नाटकात नेतृत्व बदलाची शक्यता, आणि जारकीहोळी कुटुंबाला मोठी संधी मिळणार का याची चर्चा सुरू आहे.
Belgaum Politics : बेळगावच्या राजकारणात शब्द अंतिम असतो
सतिश जारकीहोळी हे बेळगाव जिल्ह्यातील यमकनमर्डी मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांची मुलगी प्रियंका जारकीहोळी या चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. सतिश जारकीहोळी यांचा बेळगाव आणि राज्याच्या राजकारणात चांगलाच दबदबा आहे. सध्या ते बेळगावचे पालकमंत्री असून जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा शब्द हा अंतिम मानला जातो.
ही बातमी वाचा: