Karnataka Chitradurga Bus Accident: कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूरजवळ एका बस आणि कंटेनरचा आज पहाटे भीषण अपघात (Karnataka Chitradurga Bus Accident) झाला आहे. कंटेनर ट्रकने आराम बसला धडक दिल्याने अपघातात 17 जणांचा होरापळून मृत्यू (Chitradurga Bus Accident) झाला. तर 15 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. कंटेनर ट्रॅकने दुभाजकाला धडक दिल्यावर समोरून येणाऱ्या आराम बसला धडकली. त्यामुळे कंटेनर ट्रकची डिझेल टाकी फुटली आणि ठिणग्या उडल्या. यामुळे आराम बसला आग लागली. आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला.
आराम बसचा चालक आणि क्लीनरने बसमधून उडी मारल्याने ते वाचले, पण कंटेनरचा ट्रक चालक आणि क्लीनर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. बसमधून एकूण 32 प्रवासी प्रवास करत होते. सदर बस गोकर्णला निघाली होती. बसने पेट घेतल्यावर बसमधील काही प्रवाशांना बस बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला अशी माहिती उत्तर विभागाचे आयजीपी डॉ. रवीकांतेगौडा यांनी दिली. (Karnataka Chitradurga Bus Accident)
कंटेनर ट्रक चालकाच्या बेजबाबदारपणामुळे अपघात- (Karnataka Bus Accident News)
जखमीना हिरियूर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चित्रदुर्ग जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कंटेनर ट्रक चालकाच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. अपघातातील मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अपघातात मृत झालेल्यांच्या बद्दल शोक व्यक्त केला आहे.
