Kapil Sibal : "आम्ही सध्याच्या घडीला कोणतीही टीका करणार नाहीत. ही वेळ टीका करण्याची नाही. आम्ही एवढेच म्हणतोय की, तुम्ही संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा. विशेष सर्वपक्षीय बैठक बोलवा. मी राजकीय पक्षांना सल्ला तर देऊ शकत नाही. पण म्हणतोय की, जोपर्यंत सरकार हे आश्वासन देत नाही की, पीएम मोदी (PM Narendra Modi) सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहातील , तोपर्यंत विरोधी पक्षांनी बैठकीला जाऊ नये", असं राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल (Kapil Sibal) म्हणाले आहेत. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
कपिल सिब्बल म्हणाले, पीएम मोदी सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहात नाहीत, तोपर्यंत विरोधी पक्षांनी बैठकीला जाऊ नये. कारण ते पंतप्रधान आहेत. एवढा मोठा अत्याचार झालाय. आपल्या निष्पाप लोकांना मारण्यात आलंय. पंतप्रधान मोदी पहिल्यांदाही बैठकीत बसले नाहीत आणि आताही बसणार नसतील. तर आम्हाला वाटतंय की, त्यांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही. मी विश्वासाने सांगतो की, मनमोहन सिंग पंतप्रधान असते तर त्यांनी सर्वपक्षीय बैठकीला आले असते आणि विशेष अधिवेशनही बोलावले असते. यावेळी कपिल सिब्बल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्टही वाचून दाखवली..
कपिल सिब्बल पुढे बोलताना म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटवरही अनेक प्रश्न उपस्थित केले जातील... मग काय झाले (भारत-पाकिस्तान सामंजस्याबाबत), कसे आणि का, याबद्दल आम्हाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही... म्हणून आम्ही आज कोणतीही टीका करणार नाही. आम्हाला फक्त संसदेचे विशेष अधिवेशन आणि सर्वपक्षीय बैठक बोलावायची आहे. मी सर्व राजकीय पक्षांना आवाहन करू इच्छितो की जोपर्यंत सरकार पंतप्रधानांनाही बैठकीला उपस्थित राहण्याची हमी देत नाही तोपर्यंत त्यांनी बैठकीला उपस्थित राहू नये... मला विश्वास आहे की जर आज डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असते तर ते सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित राहिले असते आणि एक विशेष अधिवेशनही बोलावले असते.
डोनाल्ड ट्रम्प यांची नवी पोस्ट
"भारत आणि पाकिस्तानच्या मजबूत आणि अटल शक्तिशाली नेतृत्वाचा मला खूप अभिमान आहे... मला अभिमान आहे की, अमेरिका तुम्हाला या ऐतिहासिक आणि शौर्यपूर्ण निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकली. चर्चा झाली नसली तरी, मी या दोन्ही महान राष्ट्रांसोबत व्यापार मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे. याव्यतिरिक्त, "हजारो वर्षांनंतर" काश्मीरबाबत तोडगा निघू शकतो का हे पाहण्यासाठी मी तुमच्या दोघांसोबत काम करेन.
इतर महत्त्वाच्या बातम्या