एक्स्प्लोर

Jyoti Malhotra: होय, मी पाकिस्तानच्या सूचनेनुसार काम करत होती; ज्योती मल्होत्राची अखेर कबुली, तपासात हादरवणारी माहिती

Jyoti Malhotra: पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या ज्योती मल्होत्रा हिनी अखेर आयएसआयशी संबंधांची दिली कबुली दिली आहे.

Jyoti Malhotra: यूट्युबर ज्योती मल्होत्रा (Jyoti Malhotra) हिच्या गद्दारीचे एकेक पुरावे रोज समोर येत आहेत. पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या ज्योती मल्होत्रा हिनी अखेर आयएसआयशी संबंधांची दिली कबुली दिली आहे. पाकिस्तानात अली हसनने आयएसआय अधिकाऱ्यांशी भेट घालून दिली होती. पाकिस्तानातच आयएसआय एजंट शाकीर, राणा शाहबाजचीही भेट घेतली होती. शाकीरचा 923176250069 हा नंबर 'जट रधाँवा' नावे केला सेव्ह होता. शाकीरशी वारंवार चॅटमधून देशाविरोधातली माहिती दिल्याची कबुली गद्दार ज्योती मल्होत्राने दिली आहे. तसेच दानिशच्या मदतीने केल्या पाकिस्तानच्या दोन फेऱ्या मारल्याचं देखील ज्योती मल्होत्राने म्हटलं आहे. मी व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सतत सर्वांशी संपर्कात राहिली आणि देशविरोधी माहितीची देवाणघेवाण करू लागली. मी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात अधिकारी दानिशला अनेक वेळा भेटली, अशी हादरवणारी माहिती ज्योती मल्होत्राने दिली आहे. 

दानिशने ज्योतीला बोलावले होते डिनरसाठी- 

पाकिस्तान दूतावासातील कर्मचारी एहसान उर रहीम उर्फ दानिशने ज्योतीला डिनरसाठी आमंत्रित केले होते. या भेटीदरम्यान दोघांमध्ये संवाद झाला आणि ज्योतीने एक व्हिडीओही रेकॉर्ड केला. नंतर दानिश आणि त्याचा साथीदार अली एहसान यांनी ज्योतीची ओळख पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांशी करून दिली. ज्योती मल्होत्रा पाकिस्तान दूतावासातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती आणि त्यांच्या कार्यक्रमांनाही हजेरी लावत होती. तिचा पाकिस्तान दौरा देखील स्पॉन्सर केलेला होता. हिसार पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार, ज्योतीशी संबंधित अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स देखील सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहेत आणि लवकरच त्यांची चौकशी केली जाणार आहे. 

ज्योती मल्होत्राने घरात लिहिली होती एक चिठ्ठी-

ज्योती आणि आयएसआय अधिकारी अली हसन यांच्यातलं एक व्हॉट्सअॅप चॅट समोर आलंय. त्यात अटारीवर एखाद्या अंडर कव्हर एजंटबाबत माहिती काढण्याचं काम ज्योतीवर आयएसआयने सोपवलं होतं हे दिसून येतंय. अंडर कव्हर एजंटला भूलवून त्याला एका गुरूद्वारात नेण्याचे आदेश अली हसन ज्योतीला देत असल्याचं या चॅटमधून उघड होतंय. पाकिस्तानी आयएसआय ही संघटना ज्योतीचा वापर भारतीय गुप्तहेरांची माहिती काढण्यासाठी करत असल्याचे हे पुरावे आहेत.ज्योती मल्होत्रा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस रविवारी रात्री पावणे दोनच्या सुमारास तिला घरात घेऊन गेले होते. यावेळी ज्योतीने घरात एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी तिने घरातील मोलकरणीला लिहिली होती. 'सविता को कहना फ्रूट ला दे। घर का ख्याल रखे, मैं जल्दी जाऊंगी।' असं ज्योतीने या चिठ्ठीत लिहिलं होतं. तसंच एका औषधाचं आणि डॉक्टरचं नाव आणि शेवटी लव यू.. खुश-मुश, असं लिहिलं आहे.

कोण आहे ज्योती मल्होत्रा?

युट्यूबर ज्योती मल्होत्रा ही सामान्य घरातील मुलगी आहे. आलिशान आणि लक्झरी आयुष्य जगण्याच्या हव्यासामुळे ती देशविरोधी कारवायांमध्ये सामील झाल्याचे सांगितले जात आहे. वडिलांसोबत एका छोट्या घरात राहणाऱ्या ज्योतीला पैसे कमावण्याची इतकी घाई होती की उच्च माध्यमिक शिक्षण झाल्यावर तिने त्वरित नोकरी शोधण्यास सुरुवात केली होती. सुमारे 14 वर्षांपूर्वी तिने एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून पहिली नोकरी स्वीकारली होती.रिसेप्शनिस्टची नोकरी सोडल्यानंतर ज्योती मल्होत्रा हिसारपासून 20 किलोमीटर दूर असलेल्या एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करू लागली. मात्र, तिने तिथेही फार काळ काम केले नाही आणि नंतर हिसारमधील एका कॉलेजजवळ असलेल्या मार्केटमध्ये एका खाजगी कार्यालयात पुन्हा रिसेप्शनिस्ट म्हणून काम सुरू केले. सतत नवीन नोकऱ्या शोधणे आणि जुन्या सोडणे यातच तिचं आयुष्य पुढे सरकत गेलं. पण तिला तिच्या स्वप्नांप्रमाणे जीवन जगता येत नव्हतं.

संबंधित बातमी:

Jyoti Malhotra: ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी बनली होती ॲसेट; चीनसाठीही हेरगिरी?, नवीन कनेक्शन समोर

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget