कर्नाटक निवडणुकीतील नाट्यमय घडामोडींबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. न्यायमूर्ती ए. के. सिक्री, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती बोबडे या तीन सदस्यीय खंडपीठाने दीर्घ युक्तीवाद आणि सुनावणीनंतर हा निकाल दिला आहे. तर काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते आणि विधीज्ञ अभिषेक मनू सिंघवी आणि भाजपकडून मुकुल रोहतगी बाजू मांडली.
व्हॉट्सअॅप ज्योकचा उल्लेख
सुप्रीम कोर्टातील या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती ए के सिक्री यांनी व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड होणाऱ्या रिसॉर्ट मालकाच्या जोकचाही उल्लेख केला.
"उद्याच बहुमत चाचणी घेण्याचा पर्याय सुप्रीम कोर्टाने ठेवला. त्यावर बहुमत चाचणीसाठी किमान सोमवारीपर्यंतचा वेळ द्यावा, काँग्रेसने आपल्या आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवलं आहे. त्यांनाही मतदानासाठी यावं लागेल, त्यामुळे थोडी मुदत द्यावी," असं मुकुल रोहतगी यांनी सांगितलं.
यानंतर न्यायमूर्ती सिक्री यांनीही मजेशीर रिप्लाय दिला. ते म्हणाले की, "हो, आम्ही तो व्हॉट्सअॅप जोक वाचला आहे, ज्यात रिसॉर्टचा मालक बहुमत असल्याचं सांगून सत्ता स्थापन करण्याचा दावा करतो."
न्यायमूर्ती सिक्री यांच्या उत्तराने कोर्टरुममधील वातावरण काही क्षण हलकं फुलकं झालं होतं.
कोर्टात नेमकं काय घडलं?
बहुमत चाचणीदरम्यान गुप्त पद्धतीने मतदान होणार नाही. मतदान कोणत्या पद्धतीने करायचं याचा निर्णय हंगामी अध्यक्ष घेतील : सुप्रीम कोर्ट
उद्याच चार वाजता बहुमत सिद्ध करा, 15 दिवसांची मुदत मागणाऱ्या भाजपला सुप्रीम कोर्टाचा आदेश
कर्नाटकचा सत्तासंघर्ष : बहुमत चाचणीसाठी सुप्रीम कोर्टाने किमान सोमवारपर्यंतचा वेळ द्यावा, काँग्रेस-जेडीएस आमदार राज्याबाहेर आहेत. त्यांनाही मतदानासाठी यावं लागेल, त्यामुळे थोडी मुदत द्यावी : मुकुल रोहतगी
कर्नाटकचा सत्तासंघर्ष : बहुमत सिद्ध करण्यासाठी एक दिवस पुरेसा नाही, थोडा वेळ द्यावा, भाजपचे वकील मुकुल रोहतगी यांनी बहुमत चाचणीसाठी मुदत मागितली
कर्नाटकचा सत्तासंघर्ष : बहुमत सिद्ध झाल्याशिवाय आमदार म्हणून अँग्लो इंडियन सदस्याची शिफारस करु नये : सुप्रीम कोर्ट
कर्नाटकचा सत्तासंघर्ष : संधी मिळाली तर काँग्रेस-जेडीएस उद्याच बहुमत सिद्ध करेल : अभिषेक मनु सिंघवी
कर्नाटकचा सत्तासंघर्ष : शनिवारी बहुमत सिद्ध करण्यासाठी योग्य व्यवस्था आणि सुरक्षा पुरवण्याचे निर्देश कर्नाटक डीजीपींना देऊ : सुप्रीम कोर्ट
कर्नाटकचा सत्तासंघर्ष : येडियुरप्पांनी पाठिंब्याचा दावा केला आहे, परंतु त्यांच्याकडे आमदारांच्या पाठिंब्याची पत्र नाहीत. जर भाजपकडे पाठिंब्याचं पत्र असेल तर मुकुल रोहतगींनी ती दाखवावीत : काँग्रेस-जेडीएसचे वकील अभिषेक मनु सिंघवी
कर्नाटकचा सत्तासंघर्ष : आता दोन पर्याय आहेत. एकतर राज्यपालांच्या निर्णयावर विस्तृत सुनावणी करायची किंवा उद्याच बहुमत सिद्ध करायचं : सुप्रीम कोर्ट
कर्नाटकचा सत्तासंघर्ष : हाच तर प्रश्न आहे. आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा येडियुरप्पांनी केला आहे. पण राज्यपालांनी कशाच्या आधारावर भाजपला पहिल्यांदा सत्ता स्थापनेची संधी दिली. हा सगळा खेळच आकड्यांचा आहे. म्हणूनच हा पेच निर्माण झाला आहे : न्यायमूर्ती ए के सिक्री
कर्नाटकचा सत्तासंघर्ष : निवडणुकीआधी कोणतीही आघाडी नव्हती. राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाला आमंत्रित केलं. येडियुरप्पा सभागृहात बहुमत सिद्ध करतील. काँग्रेस-जेडीएस आमदारांकडूनही समर्थन मिळेल. यापेक्षा जास्त बोलू शकणार नाही : मुकुल रोहतगी
कर्नाटकचा सत्तासंघर्ष : सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु, भाजपचे वकील मुकुल रोहतगी यांनी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचं पत्र कोर्टाकडे सोपवलं.
संबंधित बातम्या
कर्नाटकात रिसॉर्ट पॉलिटिक्स, काँग्रेसकडून 100 रुम बूक
LIVE : बहुमत उद्याच सिद्ध करा, येडियुरप्पांना सुप्रीम कोर्टाचा झटका
कर्नाटकात उद्याच 'दूध का दूध, पानी का पानी' होईल : अभिषेक मनू सिंघवी
येडियुरप्पांचा उद्या फैसला : सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?