नवी दिल्ली : न्यायमूर्ती जगदिश सिंह केहर यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपदी प्रणव मुखर्जी केहर यांना 4 जानेवारी 2017 रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ देतील.


न्यायमूर्ती केहर देशाचे 44 वे सरन्यायाधीश असतील. 4 जानेवारी 2017 ते 4 ऑगस्ट 2017 हा केहर या कालावधीसाठी ते पदावर असतील. सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्यानंतर केहर सरन्यायाधीशपदाचा कार्यभार सांभाळतील.

भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्त झालेले ते पहिलेच शीख ठरणार आहेत. न्या. ठाकूर यांनी केहर यांच्या नावाची केंद्र सरकारकडे शिफारस केली होती.

चंदीगढच्या शासकीय महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर 1977 मध्ये त्यांनी पंजाब विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट, उत्तराखंड हायकोर्ट तसंच कर्नाटक हायकोर्टात त्यांनी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिलं आहे.
2011 मध्ये सुप्रीम कोर्टात त्यांची नियुक्ती झाली होती.