दीपक मिश्रा यांनीच याकूब मेमनचा खटला पहाटे 5 वाजता निकाली काढत पुढच्या दोन तासात याकूबला फाशी देण्यात येईल. असं जाहीर केलं होतं. याशिवाय दिल्लीतल्या निर्भया प्रकरणात चारही दोषींना त्यांनी फाशीची शिक्षाही सुनावली होती. याच प्रकरणानंतर 63 वर्षीय दीपक मिश्रा प्रकाशझोतात आले होते.
न्यायाधीश दीपक मिश्रा यांचा अल्प परिचय
दीपक मिश्रा यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1953 साली झाला. 3 मार्च 1997 रोजी ते मध्यप्रदेश हायकोर्टाचे न्यायाधीश होते. त्यानंतर 24 मे 2010 साली त्यांची नियुक्ती दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणून करण्यात आली. तर 10 ऑक्टोबर 2011 साली त्यांना सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली.