Jammu Kashmir Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधून (Jammu Kashmir) एकमोठीबातमीसमोरआलीआहे. जम्मूकाश्मीरपुन्हाएकदा दहशतवादी हल्ल्याने हादरलं आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम (Kulgam) जिल्ह्यातील केल्लम परिसरात दहशतवाद्यांनी (Terrorist Attack) बिगर-काश्मिरी मजुरांवर हल्ला केल्याचीघटनाघडलीय. या हल्ल्यात एका मजुराचा मृत्यू झाला असून, दुसरा मजूर गंभीर जखमी झाला असल्याचीमाहिती आहे. या घटनेनंतर पोलीसयंत्रणाअधिकसतर्कझालीअसूनयाप्रकरणाचातपाससुरुआहे. तरतिकडे जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घालत दहशतवाद्यांचा (Jammu Kashmir Terrorist Attack) शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
Kulgam Terrorist Attack : मजुरांचंनावआणिधर्मविचारून हल्ला
जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील किल्लम परिसरात दहशतवादी हल्ला झाला. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी दोन गैर-काश्मिरींवर गोळीबार केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आणि दुसरा जखमी झाला. मृताची ओळख छत्तीसगडचा दीपक अशी पटली आहे. तर दुसरा, भूपेंद्र कुमार, यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मिळालेल्यामाहितीनुसारहे दोघेही मजूर होते. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने स्वीकारली असल्याचीमाहितीआहे .तरमिळालेल्यामाहितीनुसारयामजुरांनात्यांचंनावआणिधर्मविचारूनहाहल्लाकरण्यातआल्याचेबोललंजातआहे.
Jammu Kashmir Terrorist Attack : सुरक्षा दलांकडून शोधमोहीम सुरू
सुरक्षा दलांनी परिसर सील केला असून हल्लेखोरांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून सुरक्षा दलांना शोधमोहीम तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले की, 'कुलगाममधील अमानुष दहशतवादी हल्ल्यात छत्तीसगडचा एक मजूर ठार झाला आहे. मी या भ्याड कृत्याचा तीव्र निषेध करतो. मी सुरक्षा दलांना आपली कारवाई तीव्र करून दहशतवाद्यांना ठार करण्याचे निर्देश दिले आहेत.' जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातला असून गुन्हेगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.
Jammu Kashmir News : प्रशासन आणि संपूर्ण देश या कुटुंबांच्या पाठीशी उभा आहे
ते म्हणाले, 'छत्तीसगडमधील आणखी एका जखमी कामगाराला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मी शोकाकुल कुटुंबियांप्रति माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या शीघ्र आरोग्यासाठी प्रार्थना करतो. जम्मू आणि काश्मीर प्रशासन आणि संपूर्ण देश या कुटुंबांच्या पाठीशी उभा आहे.'
Terrorist Attack : राजौरीच्या जंगलात दहशतवाद्यांच्या अड्ड्याचा पर्दाफाश, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त
दरम्यान, बुधवारी (22 जुलै) कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांनी शोध मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केल्यानंतर हा दहशतवादी हल्ला झाला आहे. कुलगाम पोलीस, 34 राष्ट्रीय रायफल्स (आरआर) आणि सीआरपीएफच्या 18 व्या बटालियनने तांत्रीपोरा-सुरसानूच्या फळबागांमध्ये ही कारवाई केली. पोलिसांनी त्यावेळी सांगितले होते की, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केल्यामुळे परिसरातील शांतता भंग करण्याचा दहशतवादी कट उधळला गेला आहे. तर 30 जुलै रोजी, सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथील जंगलात खोलवर असलेल्या दहशतवाद्यांच्या एका अड्ड्याचा पर्दाफाश केला. शिधावाटप आणि स्वयंपाकाची भांडी जप्त करण्यात आली. लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही संयुक्त शोध मोहीम राबवली. हा परिसर अत्यंत घनदाट असून, दाट झुडपे आणि उंच झाडांनी वेढलेला आहे, ज्यांच्या आडोशामागे दहशतवाद्यांनी आपला तात्पुरता अड्डा उभारला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
