Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमध्ये 22 एप्रिलला दुपारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरात मोठी खळबळ उडाली आहे .पर्यटनासाठी काश्मीरला आलेल्या आलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म कोणता विचारत दहशतवाद्यांनी ठार केले .या घटनेनंतर असा प्रश्न निर्माण होतोय की जम्मू आणि काश्मीरमध्ये पोलीस नक्की कुणाच्या आदेशावर काम करतात ?मुख्यमंत्री असोत की राज्यपाल जम्मू आणि कश्मीर पोलीस कोणाच्या अधिकार क्षेत्रात येतात?समजून घेऊया . (Jammu Kashmir Police)
पालकांमध्ये आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याने पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे .पुलवामा हल्ल्यानंतर हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातोय. या दहशतवादी हल्ल्यात कश्मीरला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांना गोळ्या झाडल्या .या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय 17 जण जखमी झालेत . पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ही सौदी अरेबियाचा दौरा रद्द करत दिल्लीला परत फिरले . गृहमंत्री अमित शहा रात्री उशिरापासून जम्मू आणि काश्मीर मध्ये आहेत .या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात कोणताही सुरक्षा कर्मचारी उपस्थित नव्हता .त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला .अशा परिस्थितीत प्रश्न असा आहे की जम्मू काश्मीरमधील पोलीस नक्की कोणाच्या आदेशावर काम करतात?
जम्मू काश्मीरमध्ये नक्की प्रक्रिया काय ?
जम्मू आणि काश्मीर हा एक केंद्रशासित प्रदेश आहे .काश्मीरमधील कलम 370 च्या तरतुदी रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला होता .ज्यामध्ये केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरचे जम्मू आणि काश्मीर आणि लढा असे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले होते .या निर्णयामुळे जम्मू आणि काश्मीर विधानसभेत मुख्यमंत्र्यांचे अधिकारही मर्यादित झाले .त्याचवेळी उपराज्यपालांना अधिक अधिकार देण्यात आले .केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे जम्मू आणि काश्मीरमधील पोलीस कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी थेट केंद्र सरकारकडे देण्यात आली होती . त्याचवेळी जमिनीशी संबंधित मुद्दे तेथून निवडून आलेल्या सरकारच्या नियंत्रणाखाली होते .देशाची राजधानी दिल्लीमध्ये अशीच व्यवस्था अस्तित्वात आहे जिथे पोलिस आणि कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ही उपराज्यपालांवर आहे .
जम्मू आणि काश्मीर पोलीस उपराज्यपालांच्या आधीन
जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन कायदा 2019 नुसार जम्मू आणि काश्मीर पोलीस हे उपराज्यपालांचा अधिन आहेत . जम्मू आणि काश्मीरचे सध्याचे उपराज्यपाल मनोज सिन्हा आहेत .अशा परिस्थितीत जम्मू आणि काश्मीर पोलीस फक्त एलजी मनोज सिन्हा यांच्या आदेशानुसार काम करतील .त्यावर मुख्यमंत्र्यांचा कोणताही अधिकार राहणार नाही .जम्मू आणि काश्मीर पोलिसांची थेट भरती आता जम्मू आणि काश्मीर लोकसेवा आयोगामार्फत केली जाते .त्यांच्या पदोन्नतीचा निर्णय विभागीय पदोन्नती समिती घेते .
हेही वाचा: