Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Jammu Kashmir Pahalgam Terror Attack)  या ठिकाणी  पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. जम्मू काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या वैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी काल (मंगळवारी) पर्यटकांतर केलेल्या बेछूट गोळीबारात पर्यटकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. या सर्व घटनेनंतर सोशल मिडियावरची एक फोटो मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे, तो म्हणजे एका नवीन लग्न झालेल्या जोडप्याचा. ते त्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदाच्या क्षण एकमेकांसोबत घालवण्यासाठी त्या ठिकाणी आले होते. त्यावेळी त्यांच्यावरती हा हल्ला झाला. 

या हल्ल्यातील हे एक चित्र देश कदाचित कधीही विसरणार नाही. हा व्हायरल फोटो नौदल अधिकारी विनय नरवाल आणि त्यांच्या पत्नीचा आहे. हरियाणातील करनाल जिल्ह्यातील रहिवासी विनय नरवाल हे नौदलात कार्यरत होते आणि सध्या ते कोची येथे तैनात होते. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये नौदल अधिकारी विनय नरवाल मृतावस्थेत पडलेले आणि त्यांची नवविवाहित पत्नी हिमांशी नरवाल त्यांच्या शेजारी अस्वस्थ अवस्थेत बसलेली दिसत आहे. त्या फोटोमध्ये त्या नव्या नवरीच्या हातातला लाल चूडा उठून दिसतो. त्यांचं नुकतंच लग्न झालेलं होतं. 26 वर्षीय विनय नरवाल आणि हिमांशी यांचे 16 एप्रिल रोजी उत्तराखंडमध्ये डेस्टिनेशन वेडिंग झाले होते आणि त्यानंतर 19 एप्रिल रोजी रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. हिमांशी गुरुग्रामची रहिवासी होती. तर विनय कर्नालचा होता. लग्नानंतर दोघांनीही हनिमूनसाठी काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला आणि पहलगामला भेट दिली. पण ती भेट तो क्षण आणि ती सोबत अखेरची ठरेल असं कोणाच्या ध्यानीमनी देखील आलं नसावं.

मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मारलेल्या पर्यटकांमध्ये हरियाणातील कर्नाल येथील रहिवासी नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांचा समावेश होता. फक्त 3 वर्षांपूर्वीच नौदलात सामील झाले होते. दरम्यान लग्न झाल्यानंतर फिरण्यासाठी आधी विनय आणि हिमांशी युरोपला जाणार होते. पण, शेवटच्या क्षणी व्हिसा मिळाला नाही. त्यामुळे ते जम्मू आणि काश्मीरला गेले. विनय यांचे आजोबा याबाबत एका वृत्तवाहिनीला माहिती देताना म्हणाले, "जर त्याला युरोपियन व्हिसा मिळाला असता, तर नातू विनय आज आपल्यात असता".

लेफ्टनंट विनय यांचा वाढदिवस 8 दिवसांनी 1 मे रोजी होता. लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसासाठी कुटुंबाने एका भव्य पार्टीचे नियोजन केले होते. यानंतर, 2 मे रोजी त्यांना पत्नीसह ड्युटीसाठी कोचीला परतावे लागणार होते. मात्र आता सर्व नाहीसं झालं. युरोपियन व्हिसा रद्द झाला म्हणून दोघे फिरायला काश्मीरला गेले. लग्नानंतर त्यांनी युरोपमध्ये हनिमूनचा प्लॅन केला होता. यासाठी व्हिसासाठी देखील अर्ज केला होता. पण ऐनवेळी व्हिसा मिळू शकला नाही आणि युरोपला जाण्याचा कार्यक्रम रद्द झाला. यानंतर, 21 एप्रिल रोजी दोघेही जम्मू आणि काश्मीरला रवाना झाले. 22 एप्रिल रोजी ते पहलगाममधील एका हॉटेलमध्ये थांबले होते. जेवण केल्यानंतर, ते फिरण्यासाठी गेले. त्या दरम्यान एक दहशतवादी हल्ला झाला.

वाढदिवस साजरा करायचा होता पण...

विनय यांचा वाढदिवस 1 मे रोजी होता. कुटुंबीयांनी विनय यांच्या हनिमूनवरून परतल्यानंतर त्याच्यासाठी एक मोठी पार्टी ठरवली होती. विनय 3 मे रोजी हिमांशीसोबत कोचीला परतणार होते. त्याने तिथे एक सर्व बुक केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी विनय नरवाल यांना त्यांचं नाव विचारलं होतं आणि नंतर ते हिंदू असल्याचे कळताच त्याच्यावर गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या या टार्गेट किलिंगमुळे संपूर्ण देशात आणि जगात संताप आहे. सहसा दहशतवादी अशा पर्यटकांवर हल्ला करत नाहीत, पण यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्या कुटुंबासह सहलीला गेलेल्या लोकांवर इतका भयानक हल्ला केला आहे, त्या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.