Mehraj Malik News : जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाचे आमदार मेहराज मलिक यांच्यावर पब्लिक सेफ्टी अॅक्ट (PSA) अंतर्गत करण्यात आलेली नजरकैद रद्द केली आहे. या निर्णयामुळे आम आदमी पक्षाला मोठा दिलासा मिळाला असून, मलिक यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. मेहराज मलिक यांना सप्टेंबर 2025 पासून नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यांनी आपल्या अटकेविरोधात न्यायालयात बंदी प्रत्यक्षीकरण (habeas corpus) याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर न्यायालयाने PSA अंतर्गत जारी केलेला नजरकैदेचा आदेश रद्द केला.
High Court Decision : न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून हा निर्णय दिला. यापूर्वी 23 फेब्रुवारी रोजी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला होता. अखेर खुल्या न्यायालयात हा निकाल जाहीर करण्यात आला. या निर्णयानंतर AAP चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं, “स्वागत आहे मेहराज मलिक, तुमचा संघर्ष प्रेरणादायी आहे.”
Mehraj Malik PSA Case Background : प्रकरणाची पार्श्वभूमी
मेहराज मलिक हे जम्मू-काश्मीरमधील डोडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना 8 सप्टेंबर 2025 रोजी ‘सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका’ या आरोपाखाली PSA अंतर्गत ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना कठुआ जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते.
Mehraj Malik Release Update : सुटकेचा मार्ग मोकळा
न्यायालयाचा आदेश रद्द झाल्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मेहराज मलिक यांची सुटका होण्याची शक्यता आहे. मात्र, इतर कोणत्याही प्रकरणात त्यांची आवश्यकता नसल्यासच त्यांना त्वरित दिलासा मिळणार आहे.
ही बातमी वाचा:
