Jammu Kashmir Encounter : जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची घटना घडली. यावेळी 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. सुरक्षा दल शोपियान परिसरामध्ये शोध मोहीम राबवत होते. यावेळी लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही त्याला चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दल जेव्हा परिसरात शोध मोहीम राबवत होते, तेव्हा तिथे लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी मारले गेले. मारले गेलेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. ते कोणत्या गटाशी संबंधित आहेत हे देखील समजू शकलेले नाही. विशेष म्हणजे, गुरुवारी सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला आणि शोपियान जिल्ह्यातून लष्कर-ए-तैयबाच्या या दहशतवादी संघटेनेशी संबंधीत असणाऱ्या चार साथीदारांना अटक केली होती. 






 


अन्य दोन जणांना घेतले ताब्यात


दरम्यान, दहशतवादी गट बारामुल्लाच्या मुख्य भागात पोलीस आणि इतर सुरक्षा दलांविरुद्ध शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी अवैध शस्त्रे आणि दारूगोळा वापरत असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून पोलिसांना माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,पोलिसांनी शोधमोहिम सुरू केली आहे. यासाठी सुरक्षा दलाने जेहानपोरा-खदनियार लिंक रोडसह अनेक ठिकाणी नाकेबंदी केली होती. तपासादरम्यान जेहानपोराच्या बाजूने एका स्कूटीवर दोन लोक दिसले, जे संशयास्पद वाटत होते. नाकाबंदी पाहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु सतर्क पोलिसांच्या पथकाने दोघांनाही पकडले. त्यांच्याकडून झडती घेतली असता त्यांच्याकडून एके-47 रायफलच्या 40 राउंड जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या: