Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे. गेल्या 24 तासांत सुरक्षा दलांनी तीन वेगवेगळ्या चकमकीत चार दहशतवाद्यांना ठार केले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. ही चकमक शोपियानमधील बडीमार्ग-अलौरा भागातील बागांमध्ये झाली. नदीम अहमद असे ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव असून तो कुलगामचा रहिवासी आहे.
नदीम अहमद हा हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंधित असून अनेक दहशतवादी घटनांमध्ये त्याचा हात असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याआधी लष्कर-ए-तैयबा (एलईटी) दहशतवादी संघटनेशी संबंधीत असलेल्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलानने ठारे केले होते. कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाशी संबंध असलेल्या दोन दहतवाद्यांना कंटस्नान घालण्यात आले.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कुपवाड्यातील चकतरस कंडी भागात दहशतवादी असल्याच्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी परिसराची नकाबंदी करून शोध मोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार ला. प्रत्यूत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हे दोन्ही दहशतवादी ठार झाले. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी ट्विटवरून याबाबत माहिती दिली आहे. "दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चे दोन दहशतवादी ठार झाले आहेत." असे कुमार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
याआधी सोमवारी बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा एक पाकिस्तानी दहशतवादी ठार झाला होता. तर तीन दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले. सोपोरच्या जलूर भागातील पाणीपुरा जंगलात दहशतवाद्यांदी असल्याची माहिती मिळाल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.