Baramulla Encounter : जम्मू कश्मीर (Jammu Kashmir) मध्ये आज  सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्यांचा  (Terrorist) खात्मा  (Encounter)  केला आहे.  जम्मू काश्मिरच्या पोलिसांनी   (Police)  सांगितले की, परिसरात लष्कर आणि पोलिसांची शोधमोहीम (Search Operation) सुरू आहे. या कारवाईत  दहशतवाद्यांकडून शस्त्रे  (Arms and Ammunition) जप्त करण्यात आली.


समोर आलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना दोन दहशतवादी या परिसरात लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सेनेने सर्च ऑपरेशन सुरू केले आणि या परिसरात नाकेबंदी करण्यात आली. पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू झाल्यानंतर या परिसरात गोळीबार सुरू झाला. दोन्हीकडून झालेल्या गोळीबारात एक दहशतवाद्याला ठार मारण्यात यश मिळाले आहे. तसेच  दोन जवान जखमी झाले आहे.


शनिवारी लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना शस्त्रांसह अटक


 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना शनिवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, दोन पिस्तुल मॅगझिन आणि 11 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. विशेष माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी डांगीवाचा पोलिस स्टेशनच्या हडीपोरा-रफियााबादमध्ये नाकाबंदी केली होती. नाका पॉईंट येथे तपासणी सुरू असताना, सुरक्षा दलांना पाहताच लोरीहामा लिंक रोडवरून हडीपोराकडे येत असलेल्या दोन संशयित व्यक्तींनी रस्त्यावरून पळ काढल्याचे समजले. या कारवाईत सोपोर पोलीस, राष्ट्रीय रायफल आणि सीआरपीएफच्या जवानांनी दोन्ही संशयितांचा पाठलाग करून त्यांना जिवंत पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून 2 पिस्तुल, 2 पिस्तुल मॅगझिनसह 11 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. 


125 दहशतवाद्यांना केले ठार 


सुरक्षा दलांनी या वर्षात आतापर्यंत 55 चकमकीत 125 दहशतवाद्यांना ठार केले आहे. यावर्षी दहशतवादी घटनांमध्ये आतापर्यंत दोन सुरक्षा जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 23 जण जखमी झाले आहेत. या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये 20 नागरिकांचाही बळी गेला आहे. यासोबतच या वर्षात केंद्रशासित प्रदेशात आठ ग्रेनेड हल्ले झाले आहेत. आकडेवारीनुसार, 2021 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी घटनांमध्ये 146 दहशतवादी आणि 41 नागरिकांचा मृत्यू झाला आणि तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही आपला जीव गमवावा लागला. गेल्या वर्षी दहशतवादी घटनांमध्ये एकूण 63 सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते.