जम्मू-काश्मीर : सीमेवर सुरु असलेल्या पाकिस्तानच्या कुरापतीला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. कालपासून (शुक्रवार) पाकिस्तानकडून भारताच्या 30 पोस्टवर गोळीबार करण्यात आला. त्याला बीएसएफच्या जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये चार पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला.
जम्मू-काश्मीरमधील आरएसपुरा, अरनिया, कानाचक आणि अखनूरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारताकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. भारतानं केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानच्या चार जणांचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार सुरु आहे.
दरम्यान, या भागातील गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्याचा प्रयत्न लष्कराचे जवान करत आहेत. मात्र, काही जण आपलं गाव सोडण्यास तयार नाहीत.
काल सकाळी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर त्याच्या दोनच दिवस आधी भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला होता.
कधी सुधारणार पाकिस्तान?
2017 मध्ये पाकिस्तानने तब्बल 881 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. शस्त्रसंधी उल्लंघनाला प्रत्युत्तरादाखल भारताकडून केलेल्या कारवाई पाकिस्तानचे 138 जवान ठार झाले. दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार करण्यात येतो. पाकिस्तानकडून आतापर्यंत 310 वेळा दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.
संबंधित बातम्या :
जम्मूत पाकचा पुन्हा गोळीबार, दोन नागरिकांचा मृत्यू
पाकला भारताचं चोख प्रत्युत्तर, चार पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jan 2018 10:45 AM (IST)
पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या चार नागरिकांचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी आहेत.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -