Audi Car Accident: जयपूरच्या जर्नलिस्ट कॉलनीमध्ये काल (शुक्रवारी, ता ९) रात्री उशिरा भरधाव वेगाने गाडी चालवण्याचा कहर पाहायला मिळाला. खरबास सर्कलजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या ऑडी कारचे (Audi Car Accident) नियंत्रण सुटले आणि ती प्रथम डिव्हायडरवर (Audi Car Accident) आदळली आणि नंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या पादचाऱ्यांना आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांना धडकली. या अपघातात एकूण १६ जण जखमी झाले, ज्यात एकाचा मृत्यू झाला आहे.(Audi Car Accident)
Audi Car Accident: भरधाव वेगात कार आली अन्...
प्रत्यक्षदर्शींच्या मते, ऑडी भरधाव वेगात होती आणि दुभाजकाला धडकल्यानंतर तिचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कार सुमारे ३० मीटर जात राहिली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या १२ हून अधिक गाड्यांना धडकली. रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांजवळ बसलेल्या लोकांनाही या कारची धडक बसली.(Audi Car Accident)
Audi Car Accident: ऑडी कार जप्त करण्यात आली...
अपघाताची माहिती मिळताच मुहाना पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमींना प्राथमिक उपचारासाठी तात्काळ जयपुरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऑडी कार जप्त करण्यात आली आहे आणि तपास सुरू आहे. अपघातातील ऑडी कारचा नोंदणी क्रमांक दमण-दीव असल्याचे सांगितले जात आहे.(Audi Car Accident)
Audi Car Accident: जखमींपैकी तीन ते चार जणांची प्रकृती गंभीर
जखमींपैकी आठ जणांवर जयपुरिया रुग्णालयात उपचार करण्यात आले. चार जखमींना त्यांच्या कुटुंबियांनी खाजगी रुग्णालयात नेले, तर इतर चार जण प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांसह घरी परतले. गंभीर जखमींना एसएमएस हॉस्पिटल आणि जयपुरिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तीन ते चार जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघातात रमेश बैरवा यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अपघातात एका व्यक्तीच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. जयपुरिया रुग्णालयात उपचार सुरू असताना रमेश बैरवा यांचा मृत्यू झाला. जयपूरिया रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींमध्ये पारस मोदी, मृदुल लोहार, राकेश, राजेंद्र खरोल, रमेश बैरवा, दीपक, हेमराज, मोहरी लाल मीना, रवी जैन, प्रकाश, आशिष, दिवाण, राजेश, देशराज आणि चमन जैन यांचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. एफएसएलची टीमही घटनास्थळी पोहोचली असून फॉरेन्सिक तपासणीसाठी पुरावे गोळा करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने आलेली ऑडी कार प्रथम रस्त्यावरील डिव्हायडरला धडकली. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक वाहनांना धडक दिली. अपघातानंतर ही कार सुमारे ३० मीटरपर्यंत फरफटत गेली. या दरम्यान समोर येणाऱ्या वाहनांसह रस्त्यालगत असलेल्या स्टॉल्सनाही कारने उडवले. अपघाताच्या वेळी कारमध्ये तीन जण होते. यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ते सर्वजण जयपूरचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित कारचे पासिंग दमण आणि दीव येथील असल्याचेही निष्पन्न झाले आहे.
अपघाताबाबत माहिती देताना प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हा अपघात अत्यंत भीषण स्वरूपाचा होता. भरधाव ऑडी कारने १२ हून अधिक वाहने तसेच रस्त्यालगतचे स्टॉल्स उडवले. याच दरम्यान रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक कार ऑडीच्या धडकेत जागीच उलटली. या भीषण घटनेत एकूण १६ जण जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच मुहाना आणि पत्रकार कॉलनी पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व जखमींना रुग्णवाहिकांच्या माध्यमातून त्वरित रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी १२ जखमींवर सध्या एसएमएस आणि जयपुरिया रुग्णालयात उपचार सुरू असून, उर्वरित चार जणांना प्राथमिक उपचारानंतर त्यांच्या कुटुंबियांसह घरी पाठवण्यात आले आहे.
