Jabalpur Cruise: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) जबलपूर (Jabalpur) येथील बरगी धरणाच्या जलाशयात एक मोठी क्रूझ दुर्घटना घडली असून, यामध्ये आतापर्यंत 9 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. नर्मदा नदीच्या बॅकवॉटरमध्ये आलेल्या वेगवान लाटांमुळे पर्यटकांनी भरलेली ही क्रूझ (Jabalpur Cruise Accident) पाण्यात उलटली. या दुर्घटनेतून 23 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असले, तरी अद्याप 10 जण बेपत्ता असून त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
Jabalpur Cruise: हृदयद्रावक दृश्य पाहून मंत्र्यांनाही अश्रू अनावर
बचाव कार्यादरम्यान एक अत्यंत विदारक दृश्य समोर आले. एका आईचा मृतदेह सापडला असून, तिने आपल्या 4 वर्षांच्या चिमुकल्याला छातीशी घट्ट कवटाळले होते. या अवस्थेतच दोघांचा मृत्यू झाला होता. हे दृश्य पाहून घटनास्थळी उपस्थित असलेले कॅबिनेट मंत्री राकेश सिंह यांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.
Jabalpur Cruise: व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा समोर
या दुर्घटनेतून बचावलेले दिल्लीचे पर्यटक प्रदीप कुमार यांनी क्रूझ प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. प्रदीप यांनी आपली पत्नी आणि मुलाला या दुर्घटनेत गमावले आहे. "क्रूझवर सुरक्षेची कोणतीही साधने नव्हती. जेव्हा संकट आले, तेव्हा क्रू मेंबर्सनी प्रवाशांना वाऱ्यावर सोडून दिले. पर्यटकांना वेळेवर लाईफ जॅकेटही देण्यात आले नाहीत," असा आरोप त्यांनी केला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, हवामान खराब असतानाही चालकाने क्रूझ किनारी न लावता मधल्या पाण्यात नेली, ज्यामुळे हा अपघात घडला.
Jabalpur Cruise: मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत
या दुर्घटनेची दखल घेत मध्य प्रदेश सरकारने मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. कॅबिनेट मंत्री राकेश सिंह आणि मंत्री धर्मेंद्र लोधी यांनी रात्रभर घटनास्थळी थांबून रेस्क्यू ऑपरेशनवर लक्ष ठेवले.
Jabalpur Cruise: एनडीआरएफकडून शोधमोहीम सुरू
रात्रभर पाण्यात बुडालेल्या क्रूझला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. लोखंडी तारा (वायर्स) वापरून ते ओढण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यात यश आले नाही. क्रूझ पाण्यात खोलवर अडकल्याने स्थानिकांना अडचणी येत होत्या. त्यामुळे आता भोपाळ आणि आग्रा येथून NDRF च्या पथकांना पाचारण करण्यात आले आहे. क्रूझमध्ये एकूण 39 प्रवासी होते. बेपत्ता 10 जणांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेची मदत घेतली जात आहे.
आणखी वाचा
