इस्रोतर्फे 'सार्क' देशांच्या जीसॅट 9 उपग्रहाचं प्रक्षेपण
एबीपी माझा वेब टीम | 05 May 2017 07:37 AM (IST)
फाईल फोटो
श्रीहरिकोटा : दक्षिण आशियाई उपग्रह जीसॅट 9 च्या प्रक्षेपणाचं काऊण्टडाऊन अंतिम टप्प्यात आलं आहे. इस्रो आज 11 व्या मोहिमेचं प्रक्षेपण होणार आहे. पाक वगळता 'सार्क'मधील उर्वरित देशांचा या मोहिमेत सहभाग आहे. जीसॅट 9 चं वहन करणाऱ्या जीएसएलव्ही- एम के 2 (GSLV-Mk II) या सॅटेलाईट लाँच वेहिकलचं प्रक्षेपण श्रीहरिकोटातील सतीश धवन स्पेस सेंटरमधून होणार आहे. जीसॅट 9 या दक्षिण आशियाई उपग्रहाचं वजन 421 टन तर लांबी 50 मीटर आहे. दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या या उपग्रहाद्वारे शांतीसंदेश देण्यात येणार आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून टेलिकम्युनिकेशन्स आणि प्रसारणासंदर्भातील सेवांमध्ये सहकार्य मिळणार आहे. सार्क देशांपैकी नेपाळ, भूतान, मालदीव, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांनी या मोहिमेत सहभागी होण्यास सहमती दर्शवली आहे. पाकिस्तानने मात्र या योजनेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाक वगळता दक्षिण आशियातील इतर सर्व देशांना या मोहिमेचा लाभ होणार आहे.