Iran Israel America War: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाला एक महिना पूर्ण झाला. मात्र अजूनही युद्ध थांबायचं नाव घेत नाही. उलट अमेरिकेनं इराणविरोधातील कारवाया वाढवल्या असून इराणला नेस्तनाबूत करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातंच, इराणमधील इस्फाहान शहरातील एका मोठ्या दारूगोळा कोठारावर 2 हजार पाऊंडच्या पेनिट्रेटर म्हणजेच बंकर-बस्टर बॉम्बनं हल्ला करण्यात आला आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडीओ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. दरम्यान, इस्फाहानच्या लष्करी तळांवर हल्ला झाल्याची अधिकारी अकबर सालेही यांनी माहिती दिली आहे. (Iran Israel America War)
अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर आता इराणनेही अमेरिकेला हादरवणारी धमकी दिली आहे. इराणच्या या धमकीमुळे डोनाल्ड ट्रम्पसह जगाला धडकी भरली आहे. आखाती प्रदेशातील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केल्यानंतर, आता इराण अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांना लक्ष्य करण्याची योजना आखत आहे. काल (31 मार्च 2026) इराणी रिव्होल्युशनरी गार्ड्स (IRGC) ने 18 अमेरिकन कंपन्यांवर संभाव्य हल्ल्यांबाबत इशारा दिला आहे. या यादीत गुगल आणि मायक्रोसॉफ्टचाही समावेश आहे. इराणकडून आलेल्या या धमकीमुळे आता कॉर्पोरेट आस्थापनाही असुरक्षित बनल्या आहेत. (Iran Israel America War)
ॲपल आणि गुगलसह कोणत्या 18 कंपन्या इराणच्या निशाण्यावर- (Iran Israel America War)
इराणने स्पष्ट केले की, भविष्यात जर कोणत्याही इराणी नेत्याची हत्या झाली, तर ते आखाती देशांमध्ये स्थित अमेरिकन कंपन्यांना लक्ष्य करतील. त्यांनी असा इशारा दिला की, अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून, ते अमेरिकेच्या प्रमुख तंत्रज्ञान आणि संरक्षण-संबंधित कंपन्यांना आपली लक्ष्ये म्हणून निश्चित करतील. या कंपन्यांमध्ये Cisco, HP, Intel, Oracle, Microsoft, Apple, Google, Meta, IBM, Dell, Palantir, Nvidia, JP Morgan, Tesla, General Electric, Spire Solutions, G42 आणि Boeing यांचा समावेश आहे.
सदर कंपन्या अमेरिकन गुप्तचर संस्थांना मदत करत असल्याचा इराणचा दावा- (Iran Israel America War)
सदर 18 अमेरिकन कंपन्या इस्रायली आणि अमेरिकन लष्करी तसेच गुप्तचर संस्थांशी सहकार्य करत असल्याचा दावा इराणने केला आहे. इराणने या कंपन्यांना आपल्या देशाविरुद्ध झालेल्या सायबर हल्ल्यांसाठी जबाबदार धरले आहे आणि स्वतःच्या संरक्षणासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याची घोषणा केली आहे. मायक्रोसॉफ्ट आणि ॲपल यांची कॉर्पोरेट कार्यालये संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) आहेत, जी प्रामुख्याने दुबई आणि अबुधाबी येथे केंद्रित आहेत.
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल? (Iran Israel America War)
इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल आकारण्याच्या प्रस्तावाला संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीनं मंजुरी दिली आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जाण्यासाठी इतर देशांना आता इराणला त्याच्या राष्ट्रीय चलन म्हणजेच रियालमध्ये शुल्क द्यावा लागणार आहे.. या प्रस्तावात अमेरिका आणि इस्रायलच्या जहाजांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची तरतूदही करण्यात आली आहे. मात्र, हा प्रस्ताव अद्याप कायद्यात रूपांतरित झालेला नाही. संसदेने तो मंजूर केल्यानंतर आणि इतर घटनात्मक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच त्याची अंमलबजावणी केली जाईल.
इराणविरोधात युद्धामुळे अमेरिकेचं आर्थिक कंबरड मोडलं, VIDEO:
संबंधित बातमी:
America : अमेरिकेला चार देशांकडून धक्का, लष्करी विमानं उतरवण्यास विरोध, डोनाल्ड ट्रम्प नाराज
